मला घाण भाषेत बोललं जातंय, मेसेज केले जात आहेत, प्रश्न विचारला ही माझी चुकी आहे का? : चित्रा वाघ
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी (Chitra Wagh) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा एक व्हिडीओ आणि फोटो ट्वीट केले आहेत.
![मला घाण भाषेत बोललं जातंय, मेसेज केले जात आहेत, प्रश्न विचारला ही माझी चुकी आहे का? : चित्रा वाघ Chitra Wagh on Nana Patole Viral Video Maharashtra Politics Latest Update मला घाण भाषेत बोललं जातंय, मेसेज केले जात आहेत, प्रश्न विचारला ही माझी चुकी आहे का? : चित्रा वाघ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/21/4438d54a5e08742cef9fa757da510ec91658388285_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chitra Wagh on Nana Patole : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी (Chitra Wagh) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा एक व्हिडीओ आणि फोटो ट्वीट केले आहेत. यानंतर नाना पटोले यांनी याविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. यावर बोलताना आज चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, राज्यभर नानांचा तो व्हिडीओ व्हायरल होत होता. सर्वजण एकमेकांना ते पाठवत होते, मात्र मी ज्यांचा व्हिडीओ आहे त्यांना थेट प्रश्न केला. हे काँग्रेसचं कल्चर नाही असं सांगितलं जातंय, मात्र मला घाण भाषेत बोललं जात आहे, मेसेज केले जात आहेत. मी प्रश्न विचारला ती माझी चुकी आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
नानांनी व्हिडीओ आपला आहे की नाही हे सांगायला हवं होतं, मात्र...
महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचं स्पष्टीकरण मी मागितलं. नानांनी यावर व्हिडिओ आपला आहे की नाही हे सांगायला हवं होतं. मात्र ते सांगत आहेत आम्ही कायदेशीर लढाई लढू. अगदी जरूर लढा, आम्ही देखील सर्व लढायला तयार आहोत, असं वाघ यांनी म्हटलंय. माझ्यावर सर्व काँग्रेसचे पदाधिकारी तुटून पडले आहेत. हे काँग्रेसचं कल्चर नाही असं सांगितलं जातंय, मात्र मला घाण भाषेत बोललं जात आहे. मेसेज केले जात आहेत. मी प्रश्न विचारला ती माझी चुकी आहे का? असंही त्यांनी म्हटलं आहे.
पक्षातील असले तरी कुणालाही पाठीशी घालण्याचे काम आम्ही करणार नाही
वाघ यांनी म्हटलं आहे की, सोलापूर, रायगड आणि इतर प्रकरणावर मी बोलते. सोलापूर प्रकरणातील त्या महिलेची देखील माझा संपर्क झाला. मी त्यांना भेटायला बोलावलं होतं. मात्र त्या अगोदरच हे व्हिडिओ प्रकरण बाहेर आलं. त्याही वेळेला त्या महिलेला आम्ही आवाहन केलं, जिथे असाल तिथून त्या पदाधिकाऱ्यावर एफआयआर करा. सगळ्या प्रकरणावर आम्ही काम करत असतो. पक्ष म्हणून तात्काळ जे करायचं होतं, ते आम्ही राजीनामा घेऊन केलं. सर्व कायदेशीर कारवाई होणार आहे. कुणालाही पाठीशी घालण्याचे काम आम्ही करणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षातील प्रकरणावर बोलत नाही हे बोलणं चुकीचं आहे, असं वाघ म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)