एक्स्प्लोर

'काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटिलात', व्हायरल व्हिडीओवरुन चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंना प्रश्न

Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मेघालयमधील चेरापुंजी येथील एका हॉटेलमधील असल्याचा दावा केला जात आहे.

Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मेघालयमधील चेरापुंजी येथील एका हॉटेलमधील असल्याचा दावा केला जात आहे. चित्रा वाघ यांनी या व्हिडीओमध्ये नाना पटोले असल्याचा दावा केलाय. ते एका महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचं व्हिडीओत दिसत असल्याचं वाघ म्हणाल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांचा महिलेसोबतचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत सवाल विचारला आहे. काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटिलात, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय. चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांच्या व्हिडीओविषयी पत्रकार परिषद देखील घेतली आहे.

नेटकऱ्यांनीही नाना पटोले यांना आज चांगलेच ट्रोल केले. मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. त्यामुळे नानांच्या विरोधात टीकेची झोड उठलेली आहे. मात्र या दरम्यान नाना पटोले यांना विचारपूस केली असतां त्यांनी हे भाजपचा कट कारस्थान असल्याचा आरोप केलाय. या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले.  महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खालवली असून माझी वैयक्तीच बदनामी करण्यासाठी 'तो'  व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. यावर आमची लिगल टीम तपासणी करत असून गरज पडल्यास न्यायालयातही जाण्याची आमची तयारी असल्याची प्रतिक्रीया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. मुंबई जाण्यासाठी निघाले असताना नागपूर विमानतळावर पत्रकारांशी ते संवाद साधत होते.
 

चित्रा वाघ काय म्हणाल्या ? 
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माझ्याकडे व्हिडिओ आला. मी पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा चेक केलं आणि बराच ठिकाणी तो व्हिडीओ व्हायरल झाल्याचं समजलं. महाराष्ट्रातल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा तो व्हिडिओ व्हायरल झालाय आणि म्हणूनच एकंदरीत राजकीय वातावरणामध्ये ज्या काही गोष्टी घडताना दिसतात आणि त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. सोलापूर, रायगड, नाना पटोले असूदे किंवा कोणताही पक्ष असूदे ज्यावेळी तुम्ही लोकप्रतिनिधी असता तेव्हा तुमची जबाबदारी कित्येकपटीने वाढलेली असते. सर्वांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. यातून लोकप्रतिनिधींकडून लोकांनी काय बोध घ्याला? असा प्रश्न उपस्थित होतोय, असे चित्रा वाघ म्हणाल्या. 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget