चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द; शंभर वर्षांची परंपरा खंडित करुन मंडपातच साकारणार बाप्पा
आगमनासाठी प्रसिद्ध असलेलं मुंबईतील चिंचपोकळीचा चिंतामणीचा यंदाचा आगमन सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसेच दरवर्षी कार्यशाळेत साकारणारी बाप्पाची मुर्ती शंभर वर्षांची परंपरा खंडीत करून मंडपातच साकारण्यात येणार आहे.
![चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द; शंभर वर्षांची परंपरा खंडित करुन मंडपातच साकारणार बाप्पा Chinchpokli cha chinatamani has cancelled ceremonies related to the aagman of the idol at this yers festival due to coronavirus चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द; शंभर वर्षांची परंपरा खंडित करुन मंडपातच साकारणार बाप्पा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/25084137/Chinchpokli-Chintamani.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गिरणगावातील 101व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंचपोकळीचा चिंतामणी) ने यंदा लोकभावनेचा विचार करून तसेच सध्याची कोरोना सदृश परिस्थिती पाहता आणि पोलिसांवर असलेली जबाबदारी त्यांच्यावर गणेशोत्सवात अतिरिक्त ताण पडू नये म्हणून आगमन सोहळा रद्द करून चिंतामणीच्या मंडपातच मुर्ती घडविण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुर्तीच्या उंचीबाबत शासन जे निर्देश देईल त्यानुसार, मुर्ती बनविण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली आहे. तसेच, मुर्ती जागेवर घडविण्यासाठी चिंतामणीच्या मुर्तीकार रेश्मा विजय खातू यांनी तयारी दर्शविली आहे.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळा रद्द करून ठराविक पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत ठराविक अंतर ठेवून साधेपणाने पाटपूजन होईल. यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होईल. भव्य सजावट आणि रोषणाई वर खर्च न करता जमा होणाऱ्या वर्गणीतून शासकीय हॉस्पिटलला वैद्यकिय उपकरणे तसेच गरजूंकरिता रूग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुचनांचे पालन करूनच यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता पोलीस प्रशासनावर कसल्याही प्रकारचा अतिरिक्त ताण पडणार नाही. याची मंडळाकडून दक्षता घेण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात विभागीय वर्गणीदार यांच्या व्यतिरिक्त इतर भाविकांना मुखदर्शन घेता येणार नाही. उत्सव कालावधीत विभागीय वर्गणीदार यांना नियोजनानुसार, ठराविक वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. परंतु, चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन सर्व चिंतामणी भक्तांसाठी ऑनलाईन उपलब्ध असेल. त्यामुळे उत्सव काळात इतर चिंतामणी भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन मंडळाचे मानद सचिव श्री.वासुदेव सावंत यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
गणोशोत्सवाबाबत सरकारचा निर्णय मान्य असेल, मुबंईतील गणोशोत्सव मंडळांची भूमिका
गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट, वॉर्ड स्तरावर काम करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)