एक्स्प्लोर
मुंबई रस्ते घोटाळा : आरोपपत्र दाखल, मात्र महत्त्वाची कलमं वगळली
![मुंबई रस्ते घोटाळा : आरोपपत्र दाखल, मात्र महत्त्वाची कलमं वगळली Chargesheet File Against Engineers In Mumbai Road Scam मुंबई रस्ते घोटाळा : आरोपपत्र दाखल, मात्र महत्त्वाची कलमं वगळली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/13143545/BMC_Potholes.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील रस्ते घोटाळ्याप्रकरणी अभियंत्यांवर किरकोळ कलमांसह आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मात्र या आरोपपत्रात महत्त्वाच्या कलमांचा समावेशच झालेला नसल्याची समोर येत आहे.
आरोपपत्रातून 467 आणि 420 ही फसवणुकीची कलमं वगळण्यात आली आहेत. तर 120 ब म्हणजेच कटकारस्थान रचणे या कलमाचा समावेश केला आहे. त्यामुळे आरोपी अभियंत्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.
रस्ते घोटाळाप्रकरणी महापालिकेचे मुख्य अभियंते अशोक पवार, उदय मुरुडकर तसंच कार्यकारी अभियंता किशोर येरमे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झालं आहे. जेवढे पुरावे हाती लागले, त्या आधारावर आरोपपत्र दाखल केल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)