एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
म्हाडा पुनर्विकासाच्या नियमात बदल, रिडेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा
मुंबई : म्हाडा वसाहत पुनर्विकासाच्या नियमावलीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे 56 म्हाडा वसाहतींची पुनर्बांधणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. घाटकोपर, गोरेगाव, विक्रोळी या उपनगरातील वसाहतींचा यात समावेश आहे.
पुनर्विकास करताना म्हाडाला अस्तित्वात असलेल्या घरांपेक्षा अधिकची घरं विकासकानं बांधून द्यायची हा नियम बदलण्यात आला. त्यामुळे 56 म्हाडा वसाहतींची पुनर्बांधणी करता येणार आहे. आठ वर्षांपासून या म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास रखडला होता. घाटकोपर, गोरेगाव, विक्रोळी या उपनगरातील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
2000 स्केअर मीटरपर्यंतच्या प्लॉटला प्रीमियम आकारणार. 2000 स्केअर मीटरच्या प्लॉटला वाढीव एफएसआय देणार असून 3 ऐवजी आता 4 एफएसआय मिळणार आहे.
वाढीव एफएसआयमध्ये जी घर बांधली जातील ती घरं विकासकाकडून म्हाडा विकत घेईल. वाढीव एफएसआयची घरं परवडणाऱ्या घरांच्या यादीत समाविष्ट होतील. म्हाडानं 15 टक्के अशी भूखंड दिलीत ज्यावर 1 लाख परवडणारी खरं बांधण्यात येतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
करमणूक
निवडणूक
Advertisement