एक्स्प्लोर

Land Fragmentation : जमिनींचे तुकडे प्रतिबंध अधिनियमात सुधारणांसाठी समिती स्थापन, GR जारी, 15 दिवसात अहवाल येणार

Land Fragmentation : जमिनींचे तुकडे प्रतिबंध अधिनियमात सुधारणांसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुंबई: राज्य सरकारने 'महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947' मध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, अधिनियमातील तरतुदींविरुद्ध झालेल्या जमिनींच्या तुकड्यांचे नियमितीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यावर ही समिती लक्ष केंद्रित करणार आहे. महसूल व वन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.

शेत जमिनींचे लहान तुकडे होण्यापासून रोखण्यासाठी आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 1947 चा अधिनियम लागू करण्यात आला होता. मात्र, अनेक वर्षांपासून या अधिनियमामुळे उद्भवणाऱ्या अडचणी आणि जमिनींच्या अनधिकृत तुकड्यांच्या नियमितीकरणाची मागणी जोर धरत होती. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत यासंबंधीची लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. त्यावेळी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून 15 दिवसांत याबाबत (एसओपी) मानक कार्यप्रणाली तयार करण्याचे आश्वासन दिले होते.

समितीची रचना आणि कार्यकक्षा

अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अपर मुख्य सचिव (नगरविकास-1), प्रधान सचिव (ग्रामविकास), जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, संचालक (नगर रचना), सह/उप सचिव (विधि व न्याय विभाग) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण येथील सदस्य (प्रशासकीय) राजेंद्र क्षीरसागर आणि सेवानिवृत्त संचालक (नगर रचना) एन. आर. शेंडे हे निमंत्रित सदस्य म्हणून मार्गदर्शन करतील.

या समितीची प्रमुख कार्यकक्षा पुढीलप्रमाणे आहे

नागरी क्षेत्र वगळल्यामुळे होणाऱ्या जमिनीच्या हस्तांतरणामुळे त्या भागातील विकासाचे नियोजनबद्ध हस्तांतरण व विकासाची कार्यपद्धती ठरवणे.

अधिनियमाच्या कलम 8 ब मधील तरतुदींच्या अनुषंगाने नियमितीकरणाची प्रक्रिया कशी सुलभ करता येईल आणि नियमितीकरणाची व्यवहार्यता तपासणे.

कलम 9 (3) नुसार तुकड्यांच्या नियमितीकरणाची कार्यपद्धती निश्चित करणे.

नोंदणीकृत दस्ताने झालेल्या तुकड्यांचे नियमितीकरण आणि त्यांच्या हस्तांतरणाची अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासाठी मानक कार्यप्रणाली ठरवणे.

अनोंदणीकृत खरेदी व्यवहारांमध्ये खरेदीदारांचे नाव अधिकार अभिलेखात घेण्यासाठी कायद्यात सुधारणा आवश्यक असल्यास त्या सुचवणे.

नोंदणीकृत खरेदी व्यवहारांचे नियमितीकरण मोहिम स्वरूपात घेणे.

अनोंदणीकृत खरेदी व्यवहारामुळे झालेल्या तुकड्यांचे नियमितीकरण आणि त्यानंतरच्या नोंदणी प्रक्रियेची कार्यपद्धती ठरवणे.

 समिती 15 दिवसात अहवाल देणार

समितीला 15 दिवसांत शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील जमिनींचे तुकडे पाडण्यासंबंधीच्या अनेक वर्षांच्या जटिल प्रश्नावर तोडगा निघणार आहे. जमिनीच्या नोंदी अधिक स्पष्ट होतील आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. अधिवेशन संपण्यापूर्वी अध्यादेश निघेल असे सांगितले होते, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : चंपाषष्टी उत्साहात शोककळा, नाशिकच्या ओझरमध्ये बारागाड्याखाली येऊन भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
चंपाषष्टी उत्साहात शोककळा, नाशिकच्या ओझरमध्ये बारागाड्याखाली येऊन भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
Nilesh Rane: सर्व मार्ग बंद करुन बेडरुममध्ये घुसले; निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड, पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, नेमकं काय घडलं?
सर्व मार्ग बंद करुन बेडरुममध्ये घुसले; निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड, पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, नेमकं काय घडलं?
शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याने राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत; म्हणाले, शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी
...तर शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी ठरेल; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gulabrao Patil Statement : मतांसाठी नोटा, लोकशाहीची थट्टा; मंत्र्यांकडे 'माल' म्हणून लोकशाही बेहाल? Special Report
Mumbai Controversy : 'बॉम्बे'चा डाव, 'मुंबई'वर घाव? आयआयटी बॉम्बे की आयआयटी मुंबई? Special Report
Shiv Sena VS BJP : राजकीय रामलीला, सेना - भाजपचा कल्ला! राज्याच्या सत्तेत दोस्ती, पालघरच्या आखाड्यात कुस्ती Special Report
Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : चंपाषष्टी उत्साहात शोककळा, नाशिकच्या ओझरमध्ये बारागाड्याखाली येऊन भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
चंपाषष्टी उत्साहात शोककळा, नाशिकच्या ओझरमध्ये बारागाड्याखाली येऊन भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
Nilesh Rane: सर्व मार्ग बंद करुन बेडरुममध्ये घुसले; निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड, पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, नेमकं काय घडलं?
सर्व मार्ग बंद करुन बेडरुममध्ये घुसले; निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड, पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, नेमकं काय घडलं?
शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याने राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत; म्हणाले, शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी
...तर शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी ठरेल; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
Smriti Mandhana Palash Muchhal: 'मी स्मृतीची प्रशंसक, मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा समोर आणायचा होता'; मेरी डिकोस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल
'मी स्मृतीची प्रशंसक, मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा समोर आणायचा होता'; मेरी डिकोस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
Eko Box Office Collection: ना 100 कोटी, ना 200 कोटी 95 लाखांच्या ओपनिंगवाली साऊथची 'ही' फिल्म ठरली सुपरहिट; '120 बहादूर', 'मस्ती 4'लाही पछाडलं
ना 100 कोटी, ना 200 कोटी 95 लाखांच्या ओपनिंगवाली साऊथची 'ही' फिल्म ठरली सुपरहिट; '120 बहादूर', 'मस्ती 4'लाही पछाडलं
Embed widget