एक्स्प्लोर

Central Railway : कल्याण, अंबरनाथ-बदलापूरदरम्यान गर्डर उभारणी साठी रेल्वेचा रात्रकालीन पॉवर अन् ट्रॅफिक ब्लॉक, काही गाड्या रद्द, संपूर्ण माहिती इथे वाचा

Central Railway : कल्याण येथील स्टील गर्डर उभारणी आणि अंबरनाथ बदलापूर दरम्यानच्या गर्डर डी उभारणीसाठी 9 आणि 10 ऑगस्टला रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे.

मुंबई : कल्याण येथे लोकग्राम पादचारी पुलासाठी स्टील गर्डर उभारणी, अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूलाचे गर्डर डी-उभारणी साठी 9 आणि 10 ऑगस्टला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.  विशेष म्हणजे या रविवारी  10 ऑगस्ट रोजी दिवसा मेन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसेल. 

मध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. 9  आणि 10 ऑगस्टला  (शनिवार/रविवार मध्यरात्र) रोजी रात्रौ 00.10 पासून 10.08.2025 (रविवार) सकाळी 06.55 वाजेपर्यंत खालील कामांसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक राबविण्यात येणार आहे: 

मध्य रेल्वे, मुंबई विभाग मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दि. 9  आणि 10 ऑगस्टला (शनिवार/रविवार मध्यरात्र) रोजी रात्रौ 00.10 पासून 10 ऑगस्ट  2025 (रविवार) सकाळी 6.55 वाजेपर्यंत खालील कामांसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक राबविण्यात येणार आहे:

मध्य रेल्वे, मुंबई विभाग विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक दि. ९/१०/८.२०२५ (शनिवार/रविवार मध्यरात्री) रोजी रात्रौ ००.१० ते १०.८.२०१५ (रविवार पहाटे) दरम्यान खालील कार्यासाठी विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक लागू करण्यात येणार आहे:

कल्याण स्थानकावर प्लॅटफॉर्म क्र. ३ व ४ दरम्यान लोकग्राम पादचारी पुलासाठी ४ स्टील गर्डर (स्पॅन ४) टाकण्यासाठी अप व डाउन धिम्या मार्गावर  आणि डाऊन जलद मार्गावर १४० टन क्षमतेच्या रेल्वे क्रेनद्वारे बंदी. 

अंबरनाथ व बदलापूर दरम्यान जुन्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाईपलाईन पुलाच्या जागी प्रस्तावित रस्त्यावरचा उड्डाण पूल साठी गर्डर उतरव ण्यासाठी अप व डाउन साऊथ-ईस्ट मार्गावर शॅडो ब्लॉक, ६५० टन क्षमतेच्या रोड क्रेनद्वारे किमी ६२-८८० वर ब्लॉक कालावधी: दि. ९/१०.०८.२०२५ च्या मध्यरात्री ००.१० तासांपासून ते १०.०८.२०२५ च्या पहाटे ०६.५५ वाजेपर्यंत.

विशेष ट्रॅफिक ब्लॉक खालीलप्रमाणे ००.१० तासांपासून ०६.५५ वाजेपर्यंत राबविण्यात येईल:

• अप आणि डाउन धिम्या मार्गावर – ठाकुर्ली (सर्व क्रॉसओव्हर वगळून) ते कल्याण (प्लॅटफॉर्म क्रमांक १, १अ, २ आणि ३ यांचा समावेश) दरम्यान
• डाउन जलद मार्गावर– डोंबिवली (सर्व क्रॉसओव्हर वगळून) ते कल्याण (प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि बायपास मार्ग यांचा समावेश) दरम्यान

शॅडो ब्लॉक खालीलप्रमाणे ०१.१५ वाजल्यापासून ०४.१५  वाजेपर्यंत राबविण्यात येईल: 
• अप आणि डाउन साऊथ-ईस्ट मार्गावर – अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान (दोन्ही स्थानकांचा समावेश)

ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे असतील:

डाउन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्टेड परीचालन: 

खालील ट्रेन दिवा आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या मार्गिकेद्वारे वळवण्यात येणार आहेत:
ट्रेन क्रमांक 22157 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एगमोर एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 11057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमृतसर एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 11041 दादर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 12811 लोकमान्य टिळक टर्मिनस – हातिया एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाराणसी महानगरी एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 20103 लोकमान्य टिळक टर्मिनस – आझमगढ एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नांदेड तपोवन एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 22105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंद्रायणी एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 22129 लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या तुलसी एक्सप्रेस


अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्टेड परीचालन: 

खालील ट्रेन कर्जत – पनवेल – दिवा मार्गावर वळवण्यात येतील आणि कल्याण येथे उतरणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल व ठाणे येथे थांबा देण्यात येईल:

ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस. 
ट्रेन क्रमांक 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस. 
ट्रेन क्रमांक 12702 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेनसागर एक्सप्रेस. 
ट्रेन क्रमांक 11140 होसपेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस. 
ट्रेन क्रमांक 22158 चेन्नई एगमोर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस. 

ज्या ट्रेनचा नियमित थांबा कल्याण येथे आहे, त्या ट्रेनना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल व ठाणे येथे थांबा देण्यात येईल, जेणेकरून प्रवासी कल्याण येथे चढू/उतरू शकतील. 

अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन

ट्रेन क्रमांक 22178 सिकंदराबाद – राजकोट एक्सप्रेस ही वांगणी स्थानकावर ०४.१० ते ०४.२० या वेळेत थांबवण्यात येईल. 

ट्रेन क्रमांक 11022 तिरुनेलवेली – दादर एक्सप्रेस ही नेरळ स्थानकावर ०४.१७ ते ०४.२७ या वेळेत थांबवण्यात येईल.
मेल / एक्सप्रेस गाड्या / सुट्टीकालीन विशेष गाड्या उशिराने धावत असल्यास किंवा वेळापत्रकात बदल झाल्यास, त्या कार्यपद्धतीनुसार वळवण्यात येतील.

ब्लॉक कालावधीदरम्यान उपनगरी गाड्यांची कार्यप्रणाली

ब्लॉक कालावधीदरम्यान अंबरनाथ आणि कर्जत स्थानकांदरम्यान कोणतीही उपनगरी सेवा उपलब्ध राहणार नाही.

दिनांक ९ ऑगस्ट २०२५  (शनिवार) रोजी उशिरा रात्री २१  सेवा रद्द करण्यात येतील
दिनांक १० ऑगस्ट २०२५  (रविवार) रोजी पहाटे २७ सेवा रद्द करण्यात येतील. 

शनिवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी उपनगरी गाड्यांवरील परिणाम. 

वाढवलेली सेवा :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अंबरनाथ लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १९.४२ वाजता सुटते, ती कर्जतपर्यंत वाढवण्यात येईल. 
ठाणे – बदलापूर लोकल जी ठाणे स्थान येथून २१.३२ वाजता सुटते, ती कर्जतपर्यंत वाढवण्यात येईल. 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.२४ वाजता सुटते, ती अंबरनाथपर्यंत वाढवण्यात येईल. 

सेवांचे शॉर्ट टर्मिनशन:

परळ – अंबरनाथ लोकल जी परळ स्थानकावरून २३.१३ वाजता सुटते, ती कुर्ला येथेच समाप्त होईल. 
कल्याण – कुर्ला लोकल जी कल्याण स्थानकावरून २१.०४वाजता सुटते, ती ठाणे येथेच समाप्त होईल. 
डोंबिवली – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी डोंबिवली स्थानकावरून २२.१८ वाजता सुटते, ती ठाणे येथेच समाप्त होईल. 
बदलापूर – ठाणे लोकल जी बदलापूर स्थानकावरून २३.०४ वाजता सुटते, ती अंबरनाथ येथेच समाप्त होईल. 

शनिवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी खालील उपनगरी गाड्या रद्द करण्यात येतील:

रद्द होणाऱ्या डाउन गाड्या:

परळ – अंबरनाथ लोकल जी परळ स्थानकावरून २२.४९ वाजता सुटते ती रद्द करण्यात येईल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून २२.४२ वाजता, २२.५० वाजता, २३.०८ वाजता, २३.१६ वाजता, २३.१८ वाजता, २३.३० वाजता, २३.४२ वाजता आणि २३.५१ वाजता सुटणाऱ्या लोकल गाड्या रद्द करण्यात येतील

रद्द होणाऱ्या अप गाड्या:

खालील स्थानकांवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे सुटणाऱ्या लोकल गाड्या रद्द करण्यात येतील:
कुर्ला – २२.२२ वाजता
कल्याण – २१.१९ वाजता
अंबरनाथ – २१.०७ वाजता, २१.३५ वाजता आणि २२.१५ वाजता
बदलापूर – २१.०६ वाजता, २१.५८ वाजता आणि २२.४० वाजता
टिटवाळा – २२.०६ वाजता, २२.२५ वाजता आणि २३.१४ वाजता
खोपोली – ००.३० वाजता

रविवार, दिनांक १० ऑगस्ट २०२५  रोजी खालील उपनगरी गाड्या शॉर्ट टर्मिनेट होतील:

अंबरनाथ स्थानकावरून शॉर्ट ओरिजिनेट होणाऱ्या डाउन गाड्या:

ठाणे स्थानक ययेथून ०५.०० वाजता व ०५.२७ वाजता सुटणारी ठाणे – कर्जत उपनगरी ट्रेन. 

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.३५ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – खोपोली उपनगरी ट्रेन. 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.४७ वाजता व ०५.४६ वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत उपनगरी ट्रेन. 

टिटवाळा स्थानक येथून शॉर्ट ओरिजिनेट होणाऱ्या डाउन गाड्या:

कल्याण स्थानक येथून ०५.२८ वाजता सुटणारी कल्याण – आसनगाव उपनगरी ट्रेन. 

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.१९ वाजता व ०५.०७ वाजता सुटण्याऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कसारा उपनगरी ट्रेन.  

 ठाणे स्थानक येथून ०५.४६ वाजता सुटणारी ठाणे – आसनगाव उपनगरी ट्रेन. 


कुर्ला येथून शॉर्ट ओरिजिनेट होणाऱ्या अप सेवा (रविवार, दिनांक १० ऑगस्ट २०२५) 

 टिटवाळा स्थानक येथून ०४.३२ वाजता सुटणारी  टिटवाळा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन. 

कल्याण स्थानक येथून ०६.३२ वाजता सुटणारी कल्याण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित उपनगरी ट्रेन. 

अंबरनाथ स्थानकावरून ०६.१० वाजता आणि ०७.५१ वाजता सुटणाऱ्या अंबरनाथ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन. 

ठाणे स्थानक येथून  शॉर्ट ओरिजिनेट होणाऱ्या अप गाड्या 

टिटवाळा स्थानकावरून ०५.११ वाजता, ०५.३४ वाजता आणि ०६.४६ वाजता सुटण्याऱ्या टिटवाळा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन. 

अंबरनाथ स्थानक येथून ०४.५५ वाजता आणि ०७.१७ वाजता सुटण्याऱ्या अंबरनाथ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन. 

कल्याण स्थानक येथून ०५.३९ वाजता, ०५.४२वाजता आणि ०६.१४ वाजता सुटण्याऱ्या कल्याण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन.  

कल्याण स्थानक येथून शॉर्ट ओरिजिनेट होणाऱ्या अप गाड्या 

 टिटवाळा स्थानक येथून ०७.२१ वाजता सुटणारी टिटवाळा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन. 

आसनगाव स्थानकावरून ०७.२८ वाजता सुटणारी आसनगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन. 

अंबरनाथ स्थानक येथून शॉर्ट ओरिजिनेट होणारी अप गाडी
बदलापूर स्थानकावरून ०६.५२ वाजता सुटणारी बदलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन. 

कुर्ला कार शेड स्थानक येथून शॉर्ट ओरिजिनेट होणारी अप गाडी
 कल्याण स्थानक येथून ०४.३९ वाजता सुटणारी कल्याण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन. 

रविवार, दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी रद्द होणाऱ्या उपनगरी गाड्या


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या रद्द होणाऱ्या डाउन गाड्या:

००.०२ वाजता, ००.०८ वाजता, ००.१२ वाजता, ०५.१२ वाजता, ०५.१६ वाजता, ०५.२० वाजता (वातानुकूलित लोकल), ०५.२८ वाजता आणि ०६.३७ वाजता

परळ स्थानक येथून ०६.२५ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात येईल. 

कुर्ला स्थानक येथून सुटणाऱ्या लोकल गाड्या:
०४.४५ वाजता, ०४.४८ वाजता, ०५.२६ वाजता. 

ठाणे स्थानक येथून सुटणाऱ्या उपनगरी ट्रेन:
०५.०४ वाजता, ०५.२० वाजता, ०५.३५ वाजता आणि ०६.१५ वाजता. 

खालील अप गाड्या रद्द असतील. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या पुढील लोकल गाड्या रद्द करण्यात येतील:
कुर्ला स्थानक येथून ०४.४६ वाजता (वातानुकूलित लोकल), 
परळ स्थानक येथून ०६.५४ वाजताची, 
कल्याण स्थानक येथून ०६.०३ वाजताची, 
अंबरनाथ स्थानकावरून ०३.४३ वाजता, ०४.०८ वाजता आणि ०५.१८ वाजता
टिटवाळा स्थानक येथून ०३.५६ वाजता आणि ०६.१३ वाजता
कर्जत स्थानक येथून ०२.३० वाजता आणि ०३.३५ वाजता
कसारा स्थानक येथून ०३.५१ वाजता. 

ब्लॉकपूर्वीची शेवटची डाउन लोकल (दक्षिण-पूर्व मार्गासाठी धिम्या मार्गिकेवरील) 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.२८ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – खोपोली उपनगरी ट्रेन. 

ब्लॉकपूर्वीची शेवटची डाउन लोकल (उत्तर-पूर्व मार्गासाठी जलद मार्गावर)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.४७ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कसारा उपनगरी ट्रेन. 

ब्लॉकपूर्वीची शेवटची अप लोकल (दक्षिण-पूर्व मार्गावरून) 
 बदलापूर स्थानक येथून 23.29 वाजता सुटणारी बदलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन. 

ब्लॉकपूर्वीची शेवटची अप लोकल (उत्तर-पूर्व मार्गावरून)
आसनगाव स्थानक येथून २३.०८ वाजता सुटणारी आसनगाव – ठाणे उपनगरी ट्रेन. 

ब्लॉकनंतरची पहिली डाउन लोकल (दक्षिण-पूर्व मार्गासाठी स्लो मार्गावरून) 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०५.४० वाजता सुटणारी  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अंबरनाथ उपनगरी ट्रेन. 

ब्लॉकनंतरची पहिली डाउन लोकल (दक्षिण-पूर्व मार्गासाठी फास्ट मार्गावरून) 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०६.१० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत उपनगरी ट्रेन. 


ब्लॉकनंतरची पहिली डाउन लोकल (उत्तर-पूर्व मार्गासाठी) 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०५.५१ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – टिटवाळा उपनगरी ट्रेन. 

ब्लॉकनंतरची पहिली अप लोकल (दक्षिण-पूर्व मार्गावरून):
कर्जत स्थानक येथून ०४.१० वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन. 

ब्लॉकनंतरची पहिली अप लोकल (उत्तर-पूर्व मार्गावरून):
कसारा स्थानक येथून 04.59 वाजता सुटणारी कसारा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन. 

ब्लॉकनंतर धिम्या मार्गावरील पहिली अप लोकल:
 बदलापूर स्थानक येथून ०६.४६ वाजता सुटणारी बदलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल,


मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी (१०.८.२०२५) दिवसा मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.मुख्य मार्गावर रात्री ००.२५ ते ०५.२५ या वेळेत ठाणे ते कल्याण दरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येईल.  ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – डोंबिवली, अंबरनाथ – कर्जत आणि टिटवाळा – आसनगाव या मार्गांवर विशेष सेवा चालवण्यात येतील. या पायाभूत सुविधा कामांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त करते आणि प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन करते. ही कामे प्रवाशांच्या व देशाच्या व्यापक हितासाठी करण्यात येत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपालिका निवडणुकीत कोणाची बाजी? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपालिका निवडणुकीत कोणाची बाजी? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती
कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती
Election Result : कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज
कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपालिका निवडणुकीत कोणाची बाजी? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपालिका निवडणुकीत कोणाची बाजी? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती
कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती
Election Result : कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज
कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
Embed widget