एक्स्प्लोर

Nagpur Pune Vande Bharat : नागपूर पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ,  थांबे आणि इतर माहिती एका क्लिकवर 

Vande Bharat Express : नागपूर(अजनी)- पुणे या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ 10 ऑगस्टला होणार आहे. 850 किमीचं अंतर 12 तासांमध्ये पूर्ण होईल.

Nagpur (Ajni)- Pune Vande Bharat नागपूर : महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांना थेट जोडणाऱ्या नागपूरमधील अजनी ते पुणे जंक्शन दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली  होती. येत्या रविवारी 10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. या दिवशी बेळगाव- बंगळुरु आणि अमृतसर ते श्रीमाता वैष्णौदेवी कटारा या दोन मार्गांवर देखील वंदे भारत एक्स्प्रेस 10 ऑगस्टला शुभारंभ होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकमधून तीन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. 

नागपूर मधून सुटणारी ही तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस असेल. यापूर्वी नागपूर ते विलासपूर आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहेत. आता नागपूरमधील अजनी ते पुणे अशी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. 10 ऑगस्टला उद्घाटन होणार असलं तरी नियमित फेऱ्या 14 ऑगस्टपासून सुरु होऊ शकतात, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.  

नागपूर पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला अजनी (नागपूर) हून सुटल्यानंतर वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन या स्टेशनवर थांबा असेल तर अखेरचं स्टेशन पुणे असेल. 

 रेल्वे मंत्रालयाने नागपूर - पुणे वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, रेल्वे केव्हापासून सुरू होणार याची तारीख अद्याप स्पष्ट केलेली नाही. गाडी क्र.26102 अजनी (नागपूर) येथून दररोज सकाळी 9.50  वाजता सुटेल. रात्री साडे 9.50 वाजता पुण्यात पोहचेल. तर, गाडी क्र.26101 पुणे वरून  सकाळी 6.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 6.25 वाजता अजनी (नागपूर) स्टेशन वर पोहचेल.गाडी क्र.26101 पुणे अजनी (नागपूर) एक्सप्रेस आठवड्यात मंगळवार सोडून इतर सहा दिवस चालेल.  या प्रमाणेच गाडी क्र.26102 अजनी (नागपूर) पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यात सोमवार सोडून इतर सहा दिवस चालेल.

दरम्यान, नागपूर (अजनी)- पुणे अंतर 850 किलोमीटर इतकं आहे. या मार्गावरुन धावणाऱ्या हावडा- पुणे या एक्स्प्रेसला पुणे -नागपूर अंतर पार करण्यासाठी 12 तास 50 मिनिटे लागतात. तर, पुणे- अजनी एसी स्पेशल ट्रेन 13 तास 35 मिनिटे वेळ लागतो. अजनी- पुणे वंदे भारत एक्स्प्रेस हे अंतर 12 तासात पूर्ण करेल. यामुळं विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget