एक्स्प्लोर
कल्याण स्थानकावरील धावती ट्रेन पकडण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद
कल्याणः रेल्वे स्थानकावर काल रात्री मोठी दुर्घटना होता होता टळली. गाडी पकडण्याच्या प्रयत्नात महिला फलाटावरच पडली, आरपीएफ जवानामुळे प्रवासी महिलेचा जीव वाचला. प्रवासाची घाई जिवावर कशी बेतू शकते, तो थरारक क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
एक दाम्पत्य आपल्या मुलाला घेऊन गोदान एक्स्प्रेसमधून प्रवास करणार होतं. गाडी पकडण्यासाठी अर्चना त्रिपाठी आणि श्रीपत त्रिपाठी कल्याण स्टेशनवर उभे होते. श्रीपत यांनी बॅग लगेज डब्यामध्ये टाकली, त्याचवेळी गाडी पकडण्यासाठी अर्चना यांनी आपल्या 6 वर्षाच्या मुलाला ट्रेनमधील प्रवाशाकडं दिलं.पण तोपर्यंत गाडी सुरु झाली.
त्यामुळं महिला गाडी पकडण्यासाठी धावू लागली. पण धावता धावता महिला फलाटावरच पडली. तिला आरपीएफच्या जवानानं वाचवलं. तर एक्स्प्रेसमधल्या प्रवाशानं चालत्या गाडीतूनच मुलाला फलाटावरील दुसऱ्या प्रवाशांकडे दिलं. अंगावर काटा आणणारा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पाहा सीसीटीव्हीत कैद झालेला थरारः
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement