एक्स्प्लोर

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयचं आरोपपत्र दाखल

Anil Deshmukh : अनिल देशमुखांसह अन्य दोन आरोपींविरोधात अवघ्या 59 पानांचं आरोपपत्र दाखल, देशमुखांसह संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा आरोपी म्हणून समावेश

Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं आपलं पहिलं आरोपपत्र सादर केलं आहे. दरमहा 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार सीबीआयनं पहिला गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. पुढे ईडीनं याच एफआयआरमध्ये अनिल देशमुखांसह इतरांना अटक केली. त्यानंतर हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना एप्रिल 2022 मध्ये सीबीआयनं अनिल देशमुखांसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझेला आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतलं होतं. बुधवारी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात संक्षिप्त आरोपपत्र दाखल केलं. यात अनिल देशमुखांसह त्यांचे स्विय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांचाही आरोपी म्हणून आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. तर सचिन वाझे हे आता या प्रकरणी माफीचा साक्षीदार म्हणून तपासयंत्रणेची आणि कोर्टाची मदत करणार आहेत.  

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. तसेच बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि इतरांना बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोपही केला. याप्रकरणी नोव्हेंबर 2021 मध्ये 72 वर्षीय देशमुखांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी)नं अटक केली. तेव्हापासून देखमुख आर्थर रोड कैदेतच आहेत. त्यानंतर या प्रकरणात सीबीआयनं मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाकडून देशमुखांचा जबाब नोंदविण्यासाठी परवानगी मिळवली. 3 ते 5 मार्च 2022 रोजी कारागृहात जाऊन देशमुखांचा जबाब नोंदवला. याप्रकरणी गुरुवारी सीबीआयच्यावतीनं विशेष सीबीआय न्यायालयात 59 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

आधी NIA कडून अटक, मग सीबीआयकडून बेड्या 
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचारा प्रकरणात 4 एप्रिलला सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? सदा सरवणकर पहिल्यांदाच बोलले!Israel Iran  Special Reportइस्त्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, इराणमधल्या तीन प्रांतावर मोठा हल्लाAmit Thackeray Mahim Special Report : माहीमबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?Shiv sena Vs NCP Politics : 2 राष्ट्रवादी विरुद्ध 2 शिवसेना; राज्यात राजकीय महाभारत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
राजसाहेबांचा चिरंजीव आहे, भाजपची इच्छा असेल तर अमित ठाकरेंना विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी : समाधान सरवणकर
अमित ठाकरेंनी राज्यसभा, विधानपरिषदेचा विचार करावा, सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, सरवणकरांच्या लेकाचा सल्ला 
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Embed widget