Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री रिया चक्रवर्तीला कोर्टाचा दिलासा
सुशांतसिह राजपूर मृत्यू प्रकरण आणि ड्रग्स प्रकरणात चौकशी सुरु असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. ती आबुधाबी येथे होणाऱ्या आयफा पुरस्कारात सहभागी होण्यासाठी जाईल.
![Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री रिया चक्रवर्तीला कोर्टाचा दिलासा Bollywood actress Rhea Chakraborty allowed to go abroad by sessions court in Mumbai Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री रिया चक्रवर्तीला कोर्टाचा दिलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/87a9ee8a7b3985390d8cf2679f14a126_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधीत ड्रग प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबईच्या न्यायालयाने दिलासा दिला आहे. तिला परदेशी वारीसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. यात तिला अबुधाबी येथील भारतीय दूतावासात दररोज हजेरी लावावी लागेल.तसेच हरेजीची शीट 6 जून रोजी कोर्टात सादर करावी लागणार आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून तिला कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये 1 लाख रुपये जमा करावे लागणार आहे.
रियाला एनसीबीने ड्रग प्रकरणात अटक केली होती आणि तिचे पासपोर्टही जप्त करण्यात आले होते. यावर रियाच्या वकिलांनी कोर्टात आबुधाबी येथे होणाऱ्या आयआयएफए पुरस्कारांसाठी 2 ते 8 जून दरम्यान आबुधाबी जाण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी अर्ज केला केला होता.
रियाचा अर्ज
आबुधाबी येथे आयआयएफएचे निदेशक आणि सह-संस्थापकांनी रियाला ग्रीन कार्पेटवर वॉक करिता तसेच 3 जून 2022 रोजी एक पुरस्कार देण्यासाठी आणि 4 जून रोजी मुख्य पुरस्कार वितरण सोहळ्यातील एका कार्यक्रमाच्या अँकरिंगसाठी निमंत्रित करण्यात आले असल्याचे रियाच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.
सध्या सुरु असलेल्या गुन्हेगारी प्रकरण आणि परिस्थितीमुळे आधीच रियाच्या करिअरमध्ये खुप अडथळे येत आहेत. तिला आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागले आहे.म्हणून अशा प्रकारच्या संधीमुळे तिच्या अभिनयाच्या करिअरसाठी हे महत्वाचे टप्पे आहेत. शिवाय रियाचे वृद्ध आई-वडील देखील आर्थिक बाबींसाठी तिच्यावरच अवलंबून असल्याचे तिच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. ही मागणी कोर्टाने मान्य करुन तिला पाच जूनपर्यंत पासपोर्ट वापरण्याची परवानगी दिली आहे. तसेच सहा जून रोजी पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
सप्टेंबर 2020 मध्ये झाली होती अटक
रियावर 2020मध्ये एनसीबीने खटला दाखल करुन त्याच्या तपासासाठी तिला 6,7,8 सप्टेंबर 2020 रोजी बोलावले होते. नंतर 8 सप्टेंबर रोजी तिला अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी कोर्टाने तिची रवानगी तरुगांत केली. यानंतर एका महिन्यानंतर तिला 7 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)