एक्स्प्लोर
शिवाजी पार्क जवळील मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत बांधकाम दोन आठवड्यात हटवणार
महापौर बंगल्याच्या मागील बाजूस मोकळा भूखंड असून हा भूखंड सर्वसामान्यांना तसेच मुलांना खेळण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 1991 च्या विकास आराखड्यात याची तशी नोंद आहे.
![शिवाजी पार्क जवळील मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत बांधकाम दोन आठवड्यात हटवणार BMC will restore open plot behind The Park Club near Shivaji Park शिवाजी पार्क जवळील मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत बांधकाम दोन आठवड्यात हटवणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/22203847/shivaji-park.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवाजी पार्क जवळील मोकळ्या भूखंडावर उभारण्यात आलेलं 'ते' लोखंडी बांधकाम दोन आठवड्यात हटवण्यात येणार असून ती जागा पूर्ववत करणार असल्याची हमी मुंबई महापालिकेने सोमवारी हायकोर्टात दिली. 'द पार्क क्लब'च्या मागे फुटबॉल खेळणाऱ्यांच्या सोयीसाठी जाळी बसवल्याची पालिकेकडून माहिती देण्यात आली होती.
या याचिकेवर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात झाली.
महापौर बंगल्याच्या मागील बाजूस मोकळा भूखंड असून हा भूखंड सर्वसामान्यांना तसेच मुलांना खेळण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 1991 च्या विकास आराखड्यात याची तशी नोंद आहे. परंतु या ठिकाणी लोखंडी पिलर्स आणि जाळी लावून समुद्र किनाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दरवाजा उभारण्यात आला आहे.
या भूखंडालगत असलेल्या पार्क क्लबच्या मागील बाजूस सध्या भिंत बांधली जात आहे. त्यामुळे हे बांधकाम हटवण्यात यावे आणि हा भूखंड पूर्वीप्रमाणे सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी पंकज राजमाचिकर यांनी हायकोर्टत ही याचिका दाखल केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बॉलीवूड
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)