एक्स्प्लोर

Diwali : फटाके फोडताना काय काळजी घ्याल? कोणत्या गोष्टी टाळाल? अग्निशमन दलाच्या मार्गदर्शक सूचना जारी

BMC Fire Brigade Guidlines : पर्यावरणाची काळजी घेत, सुरक्षिततेचे नियम पाळत दिवाळी साजरी करा, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 101 व 1916 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई : यंदाचा दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी आपल्या अवतीभवतीच्या पर्यावरणाचाही सजगपणे विचार करावा. तसेच दिवाळीत फटाके फोडताना (Diwali Fire Crackers) लहान मुलांची काळजी घ्यावी. यासोबतच फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होणार नाही, याबाबत मुंबईकरांनी दक्ष रहावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे.

दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तात्काळ 101 किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक 1916 यावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे.

BMC Fire Brigade Guidlines : फटाके फोडताना काय काळजी घ्याल?

1. सुती कपडे परिधान करावेत.

2. फटाके मुलांपासून लांब ठेवावेत. मुले फटाके फोडतांना मोठ्यांनी सोबत रहावे.

3. फटाके फोडताना नेहमी पादत्राणे वापरावीत.

4. फटाके फोडताना / उडवताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व कोणाला भाजल्यास तात्काळ त्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे.

5. फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलबाजीचा वापर करावा.

Diwali Fire Crackers Guidlines : फटाके फोडताना पुढील बाबी टाळाव्यात

1. इमारतीत व जिन्यावर, तसेच टेरेसवर फटाके फोडू नयेत.

2. फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा वापर टाळावा.

3. झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत.

4. खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावू नयेत.

5. विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा वाहनांजवळ, वाहनतळाच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत.

6. घर, इमारत, परिसर इत्यादी ठिकाणी विद्युत रोशणाई करताना अधिकृत विद्युत तंत्रज्ञांची मदत घ्यावी. तसेच निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचे विद्युत भार (ओव्हरलोड) होणार नाही, याची काळजी घ्यावी.

प्रकाशाचा सण, सणांचा राजा, दीपोत्सव अशी ओळख असणारा दिवाळीचा सण मुंबईकरांनी अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा. तसेच दिवे लावताना व फटाके फोडताना आपल्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, विशेष करुन लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छांसह करण्यात येत आहे.

काही वेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटनांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याकरीता योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Embed widget