एक्स्प्लोर

BMC Budget 2022 : मुंबईकरांना काय मिळणार? महापालिकेचा अर्थसंकल्प आज ऑनलाईन सादर होणार

BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज ऑनलाईन सादर होणार आहे. निवडणुकीनिमित्त नवी करवाढ किंवा शुल्कवाढ न करण्याकडे सत्ताधारी शिवसेनेचा कल

BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचं बजेट आज ऑनलाईन सादर होणार आहे. त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला काय गिफ्ट मिळणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन कोणतीही नवी करवाढ किंवा शुल्कवाढ न करण्याकडे सत्ताधारी शिवसेनेचा कल असणार आहे. तसंच मुंबईकर मतदारांना खूश करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचीही घोषणा होणार असल्याचं समजतं. खड्डेमुक्त रस्ते, सक्षम आरोग्य यंत्रणा, पूरमुक्त मुंबई यासाठी यंदाच्या अर्थसंकल्प तरतूद केली जाणार असल्याचं कळतंय. 

निवडणुकीच्या तोंडावर आज आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजही मुंबई महापालिकेचे ऑनलाईन बजेट सादर होणार आहे. यंदाच्या वर्षात महापालिकेच्या अर्थसंकल्पात 3 हजार कोटींपर्यंतची वाढ होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेचं बजेट काय असणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काय असणार? करवाढ, शुल्कवाढ होणार का? मुंबईत कोणत्या प्रकल्पांवर सत्ताधाऱ्यांचा कल असेल? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय मिळणार?

कोस्टल रोड प्रकल्पावर  वाढीव तरतुद

12 हजार कोटी रुपयांची तरतूद याआधीच्या अर्थसंकल्प करण्यात आली आहे. मात्र पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करणं अपेक्षित असल्यानं अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी करण्याचा प्रकल्प
 
समुद्राचं पाणी गोडं करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला असून यासाठी मोठी तरतूद करण्यात येणार आहे. 

आरोग्य यंत्रणेवर मोठी तरतुद

दवाखान्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून मोठ्या रुग्णालयांचा विस्तार करण्यात येणार आहे. 
                   
बेस्टला किती अनुदान  

बेस्ट उपक्रम तोट्यात असून बेस्टची गेल्या तीन वर्षांची तूट भरून काढण्यासाठी पालिकेने बेस्टला 6650.48 कोटी रुपये दिले. त्यामुळे बेस्टचा थोडासा भार हलका झाला आहे. तरीही बेस्ट ची अद्याप तीन हजार कोटींची तूट शिल्लक आहे. पालिकेने 2020-21 मध्ये बेस्टसाठी 1500 कोटींची तरतूद केली होती. यावर्षी बेस्टसाठी महापालिका काय तरतुद करते याकडे लक्ष लागलं आहे.

काही विशेष प्रकल्प/योजनांवरही तरतुद

  • विविध विषाणुंचा अभ्यास करण्यासाठी विशेष रुग्णालयं
  • पालिकेच्या दवाखान्यांची संख्या वाढवणार, दवाखाने संध्याकाळच्या वेळेतही सुरूच राहणार
  • नद्यांचं सौंदर्यीकरण, मिठी नदीमध्ये बोटिंग सुरु करणार 
  • सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या नव्या शाळा
  • कचऱ्याची विल्हेवाट प्रकल्प, कचर्‍यापासून वीज प्रकल्प करणार 
  • पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना, पर्यावण संवर्धन उपक्रम
  • उत्पन्न वाढीसाठी नवीन स्तोत्र निर्माण करणं
  • पुलांच्या मजबुतीसाठी, नवीन पुलांसाठी विशेष निधी, सीसीटीव्ही कॅमेरे

महापालिकेच्या गेल्या दोन वर्षांतील अर्थसंकल्प कसा होता?

पालिकेचा 2020-2021 मध्ये बजेट मांडताना 33441.02 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षी 2021-22 च्या बजेटमध्ये नव्या प्रकल्पांसह मोठ्या विकास योजनांसाठी तब्बल 16.74 टक्केची वाढ करून 39 हजार 038 कोटींचा मेगा बजेट सादर करण्यात आलं होते. तर यंदाच्या अर्थसंकल्पात आणखी वाढ होऊन पालिकेचा अर्थसंकल्प 41 हजार कोटींचा मांडला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी पाहा फक्त एबीपी माझा लाईव्ह 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
एटीएसच्या कारवाईत धक्कादायक बाबी समोर!  तलवारींसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त 
एटीएसच्या कारवाईत धक्कादायक बाबी समोर!  तलवारींसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त 
Milind Narvekar : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, अवजड वाहनांसदर्भात मोठी मागणी
मिसिंग लिंक प्रकल्प सुरु झाल्यानंतर सुरुवातीचे 6 महिने अवजड वाहनं सोडू नका, मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Municipal Corporation: दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
Mantralaya Bribery Sting Operation: '50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
'50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
Abhishek Sharma Jersey T20 World Cup 2026: पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप
मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा NCERT नं एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर मुधोजीराजेंचा आरोप
T20 WC 2026 Ind vs Ned Abhishek Sharma: आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
Shani Transit 2026: शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
Embed widget