एक्स्प्लोर

BMC Budget 2022 : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बीएमसीचं 'सर्वांसाठी पाणी' नवं धोरण, अर्थसंकल्पात विशेष तरतूदी

BMC Budget 2022 : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बीएमसीचं 'सर्वांसाठी पाणी' नवं धोरण. अर्थसंकल्पात अनेक विशेष तरतूदी.

BMC Budget 2022 : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आज महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी अनेक विशेष तरतुदींची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली. अशातच मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर 'सर्वांसाठी पाणी' हे नवं धोरण महापालिकेनं जाहीर केलं आहे. याआधीही सत्ताधारी शिवसेनेनं 24 तास पाणी देण्याचं मुंबईकरांना आश्वासन दिलं होतं. मात्र याचा केवळ प्रायोगिक प्रकल्प मुलुंड-वांद्रे पश्चिममध्ये सुरु करण्यात आला. पण त्यानंतर तो बंद पडला. 

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिकेचा पाणीपुरवठा व्यवस्थेवर भरीव तरतूद करण्यात आली आहे. मुंबईकरांना खाऱ्या पाण्यातून गोडं पाणी मिळणार आहे. मुंबईत खाऱ्या पाण्यापासून गोडं पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाकरता 200 कोटींती तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाद्वारे दिवसाला समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून 200 दशलक्ष लिटर गोडं पाणी मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. 

अर्थसंकल्पात जलविद्युत प्रकल्पासांठीही तरतूद करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा तलावावर 20 मेगावॅट क्षमतेचा जलविग्युत प्रकल्प , 80 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरउर्जा प्रकल्पासाठी 10.30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलवहन बोगद्यांसाठी 467 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

दरम्यान, मुंबई महापालिका बजेटवर आगामी  निवडणुकींची छाप दिसून येत आहे. मुंबई महापालिकेचा 45 हजार 949 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर केला. निवडणुकीआधीच्या या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी 200 शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर केंद्राच्या या योजनेचं मुंबईत नामकरण 'शिवयोग केंद्र' असं नामकरण करण्यात आलं आहे. मुंबईत कचरा निर्माण करणाऱ्यांना वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे. मुंबईतील 3500 उपहारगृहांना कचऱ्याकरता वापरकर्ता शुल्क भरावं  लागणार आहे. 

मुंबई महापालिका अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा 

  • आगामी मुंबई महापालिका निवडणुकींच्या तोंडावर  महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर, यंदाचा अर्थसंकल्प आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात 17.70% ची वाढ, यंदा 45949 कोटींचा अर्थसंकल्प सादर
  • विकास नियोजन खात्याकडून मिळणारे उत्पन्न 2 हजार कोटी रुपये, असा अंदाजित केला होता. ते 14750 कोटी रुपये इतके सुधारित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यात 12750 कोटी रुपये इतकी तरतूद 
  • 500 चौ. फुट किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असलेल्या निवासी मालमत्तांना सवलत जवळपास 16,14,000 नागरीकांना मालमत्ता करामधून 100% सवलत. प्रतिवर्षी नागरीकांना देण्यात येणाऱ्या सवलतीची रक्कम ₹462 कोटी इतकी असेल.
  • सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी मिळणारे अंदाजित. उत्पन्न हे 7000 कोटींवरुन 4800 कोटी रुपयांची सुधारीत तरतूद 
  • मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाढ, तरी तिजोरीला मात्र गळती, महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट, मालमत्ता करातून मिळणारं उत्पन्न 7000 कोटींवरुन 4800 कोटी इतकं सुधारित करण्यात आलंय
  • निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी नव्या 'वापरकर्ता शुल्का'ची घोषणा, कचरा निर्मीती करणाऱ्यांना भरावं लागणार शुल्क, वर्षाकाठी वापरकर्ता शुल्कातून 174 कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य
  • मुंबईतील महत्वाचे मोठे प्रकल्प कोस्टल रोड, जीएमएलआर, एसटीपी अशा प्रकल्पांच्या भांडवली खर्चात मोठी वाढ, मागील वर्षाच्या तुलनेत भांडवली खर्चात 56% वाढ, 22646.73 कोटींचा भांडवली खर्च 
  • मुंबई अर्थसंकल्पात कलाकारांसाठी दोन नव्या योजना, तरुण चित्रपट निर्मात्यांना चालना देण्यासाठी 'युनेस्को क्रिएटीव्ह सिटी ऑफ फिल्म', चित्रकलाकारांसाठी बस शेल्टर मोहीम
  • मुंबईकरांना खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी मिळणार, मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेवर भरीव तरतूद, खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरणासाठी 200 कोटींची तरतूद
  • मुंबई महापालिकेच्या बजेटवर आदित्य ठाकरेंच्या संकल्पनांचा ठसा, मुंबईतील वाढत्या हवामान बदलांसाठीच्या कृती आरखड्यासाठी 1 कोटींची तरतूद, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची ही संकल्पना
  • मुंबई पुरमुक्त आणि पर्जन्य जल उदंचन 526 कोटींची तरतूद, मुंबईत पुलांची दुरूस्ती आणि निर्मितीसाठी भरीव तरतूद 1576 कोटींची, नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी 200 कोटी, दहिसर पोईसर ओशिवरा आणि वालभट्ट नद्यांचे पुनरूज्जीवन
  • मुंबईतील नवे रस्ते तसेच, रस्ते सुधारणांकरता 2200 कोटींची तरतूद, मुंबईतील 47 पुलांच्या मोठ्या दुरुस्त्या, 144 पुलांच्या किरकोळ दुरुस्त्यांच्या कामासाठी 1576.66 कोटींची तरतूद
  • मुंबईतील मलनि:सारण प्रकल्पांसाठी (एसटीपी) 2072 कोटींची तरतूद, यापैकी 7 एसटीपी प्रकल्पांसाठी 1340 कोटींची तरतूद 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget