एक्स्प्लोर

मुंबई पालिकेचं 'इलेक्शन बजेट! महापालिकेचा अर्थसंकल्प 45 हजार 949 कोटींचा; शिक्षण, आरोग्यावर भर

BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचा 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. शिक्षण आणि आरोग्यावर भर, मुंबईकरांच्या आरोग्यासाठी शिवयोग केंद्र स्थापण करण्यात येणार आहे.

BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचा 45 हजार 949 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर केला. निवडणुकीआधीच्या या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी 200 शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर केंद्राच्या या योजनेचं मुंबईत नामकरण 'शिवयोग केंद्र' असं नामकरण करण्यात आलं आहे. मुंबईत कचरा निर्माण करणाऱ्यांना वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे. मुंबईतील 3500 उपहारगृहांना कचऱ्याकरता वापरकर्ता शुल्क भरावं  लागणार आहे. 

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद महापालिकेने केली आहे. सन 2022-2023 चा 45 हजार 949.21 कोटींचा आणि 8.43 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षी 39 हजार 38 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. 

मुंबई महापालिका अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा 

  • आगामी मुंबई महापालिका निवडणुकींच्या तोंडावर  महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर, यंदाचा अर्थसंकल्प आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात 17.70% ची वाढ, यंदा 45949 कोटींचा अर्थसंकल्प सादर
  • विकास नियोजन खात्याकडून मिळणारे उत्पन्न 2 हजार कोटी रुपये, असा अंदाजित केला होता. ते 14750 कोटी रुपये इतके सुधारित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यात 12750 कोटी रुपये इतकी तरतूद 
  • 500 चौ. फुट किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असलेल्या निवासी मालमत्तांना सवलत जवळपास 16,14,000 नागरीकांना मालमत्ता करामधून 100% सवलत. प्रतिवर्षी नागरीकांना देण्यात येणाऱ्या सवलतीची रक्कम ₹462 कोटी इतकी असेल.
  • सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी मिळणारे अंदाजित. उत्पन्न हे 7000 कोटींवरुन 4800 कोटी रुपयांची सुधारीत तरतूद 
  • मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाढ, तरी तिजोरीला मात्र गळती, महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट, मालमत्ता करातून मिळणारं उत्पन्न 7000 कोटींवरुन 4800 कोटी इतकं सुधारित करण्यात आलंय
  • निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी नव्या 'वापरकर्ता शुल्का'ची घोषणा, कचरा निर्मीती करणाऱ्यांना भरावं लागणार शुल्क, वर्षाकाठी वापरकर्ता शुल्कातून 174 कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य
  • मुंबईतील महत्वाचे मोठे प्रकल्प कोस्टल रोड, जीएमएलआर, एसटीपी अशा प्रकल्पांच्या भांडवली खर्चात मोठी वाढ, मागील वर्षाच्या तुलनेत भांडवली खर्चात 56% वाढ, 22646.73 कोटींचा भांडवली खर्च 
  • मुंबई अर्थसंकल्पात कलाकारांसाठी दोन नव्या योजना, तरुण चित्रपट निर्मात्यांना चालना देण्यासाठी 'युनेस्को क्रिएटीव्ह सिटी ऑफ फिल्म', चित्रकलाकारांसाठी बस शेल्टर मोहीम
  • मुंबईकरांना खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी मिळणार, मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेवर भरीव तरतूद, खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरणासाठी 200 कोटींची तरतूद
  • मुंबई महापालिकेच्या बजेटवर आदित्य ठाकरेंच्या संकल्पनांचा ठसा, मुंबईतील वाढत्या हवामान बदलांसाठीच्या कृती आरखड्यासाठी 1 कोटींची तरतूद, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची ही संकल्पना
  • मुंबई पुरमुक्त आणि पर्जन्य जल उदंचन 526 कोटींची तरतूद, मुंबईत पुलांची दुरूस्ती आणि निर्मितीसाठी भरीव तरतूद 1576 कोटींची, नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी 200 कोटी, दहिसर पोईसर ओशिवरा आणि वालभट्ट नद्यांचे पुनरूज्जीवन
  • मुंबईतील नवे रस्ते तसेच, रस्ते सुधारणांकरता 2200 कोटींची तरतूद, मुंबईतील 47 पुलांच्या मोठ्या दुरुस्त्या, 144 पुलांच्या किरकोळ दुरुस्त्यांच्या कामासाठी 1576.66 कोटींची तरतूद
  • मुंबईतील मलनि:सारण प्रकल्पांसाठी (एसटीपी) 2072 कोटींची तरतूद, यापैकी 7 एसटीपी प्रकल्पांसाठी 1340 कोटींची तरतूद 

महापालिकेचा 3370 कोटी रुपयांचा शिक्षण अर्थसंकल्प 

आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेचं बजेट काय असणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काय असणार? करवाढ, शुल्कवाढ होणार का? मुंबईत कोणत्या प्रकल्पांवर सत्ताधाऱ्यांचा कल असेल? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.  अशातच मुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेचा 3370 कोटी रुपयांचा शिक्षण अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अशातच शैक्षणिक अर्थसंकल्पात मुंबई पब्लिक स्कूलच्या शाळांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु, ही घोषणा हवेत विरली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

BMC Education Budget 2022 : मुंबई महापालिकेचा 3370 कोटी रुपयांचा शिक्षण अर्थसंकल्प सादर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget