BMC Education Budget 2022 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; शिक्षणासाठी 3370 कोटींची तरतूद
BMC Education Budget 2022 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात 3370 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
BMC Education Budget 2022 : आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेचं बजेट काय असणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काय असणार? करवाढ, शुल्कवाढ होणार का? मुंबईत कोणत्या प्रकल्पांवर सत्ताधाऱ्यांचा कल असेल? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात 3370 कोटी रुपयांची शिक्षणासाठी करण्यात आली आहे. अशातच शैक्षणिक अर्थसंकल्पात मुंबई पब्लिक स्कूलच्या शाळांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु, ही घोषणा हवेत विरली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या ऑनलाईन शिक्षणाचे पडसाद या अर्थसंकल्पावर झाल्याचं दिसून येत आहे. मुंबई महापालिका शाळांच्या वर्ग खोल्या डिजिटल करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला असून त्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. पालिका शाळांच्या 2,514 वर्ग खोल्या डिजीटल होणार आहेत.
महापालिकेच्या अंतर्गत 8 माध्यमांच्या 963 प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये 6031 शिक्षक सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. 243 माध्यमिक शाळांमधून 1383 शिक्षकांच्या माध्यमातून मोफत शिक्षण दिले जात आहेत. मोफत वस्तूंसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2514 वर्ग खोल्या डिजिटल होणार आहेत. यासाठी प्राथमिक वर्गांसाठी 23.25 कोटी रुपये तर माध्यमिक वर्गांसाठी 3.76 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका शैक्षणिक अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे :
- मुंबई महापालिकेचे यंदाच्या वर्षीचे शिक्षण बजेट : 3370 कोटी
- थिंकींग लॅबसाठी : 29 लॅब
- व्हर्च्युअल ट्रेंनींग सेंटरसाठी : 38 कोटी 2 लाख
- शाळा इमारतींची दुरुस्ती, पुर्नबांधणी : 419 कोटी
- शाळांची देखभाल- स्वच्छतेसाठी : 75 कोटी
- टॅब योजनेसाठी : 7 कोटी
- यंदा केंब्रिज विद्यापिठाशी संलग्नित आयजीएससी आणि आयबी शाळांची उभारणी होणार, या नव्या 2 शाळांकरता 15 कोटीची तरतुद
- खगोलशास्त्रीय प्रयेगशाळांकरता : 75 लाख
- खाजगी प्राथमिक शळांना महारालिकेकडून अनुदान : 414 कोटी
- सध्या CBSC च्या 11 आणि आयसीएससी बोर्डाची 1 अशा एकूण 12 शाळा मुंबईत सुरु आहेत
- मुंबई महापालिका शिक्षण बजेटवर आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण विभागाचा ठसा
- मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना जंगल सफारी, निसर्ग उद्यान,अभयारण्यांना भेटी घडवणार : तरतुद 31 लाख
- शाळांच्या अग्निशमन यंत्रणेकरता : 2.64 कोटींची तरतुद
- महापालिका शालेय विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बस पास करता : 4.25 कोटी
- महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंचा मोफत पुरवठ्यासाठी : 100 कोटी
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ठरलं! दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच; राज्य शिक्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha