एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC Budget 2018 : मध्यमवर्गीयांना दिलासा, करात कोणतीही वाढ नाही
यावर्षीच्या अर्थसंकल्पात सर्वात दिलासादायक बाब म्हणजे करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेने सर्वाधिक जोर शिक्षणावर दिला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी शिक्षणासाठी 2569 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद 2311 कोटी रुपये होती.
महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 27 हजार 258 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी 25 हजार 141 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सर्वात दिलासादायक बाब म्हणजे करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
- कोस्टल रोडसाठी 1500 कोटींची तरतूद
- विद्यमान करांमध्ये कोणतीही वाढ नाही, नवे कर प्रस्तावित नाहीत.
- गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता प्रकल्प – 100 कोटी रुपयांची तरतूद
- रस्ते कामासाठी – 1202 कोटी
- सात रस्ता येथील संगमस्थानावरील सुशोभीकरण
- पावसाळ्यातील खड्डे बुजवून तात्काळ दिलासा मिळण्याकरता महापालिकेद्वारे खास प्लँटची उभारणी करण्यात येणार
- ब्लँक स्पॉट्सची निश्चिती करुन ब्लँक स्पॉट आणि हटवण्याचं काम करण्यात येणार
- नद्या आणि नाल्यांमध्ये कचरा अडकून पाणी तुंबण्याच्या परिस्थितीला अटकाव करण्यासाठी दहिसर, पोयसर, ओशिवरा, मिठी या नद्यांच्या पातमुखांवर फ्लोटिंग ट्रॅश बूम्स बसवण्याचा प्रस्ताव
- हिंदमाता या पूरप्रवण क्षेत्रासाठी खास 1800 मिमी व्यासाच्या परिजन्य जलवाहिन्यांचे बांधकाम मायक्रोटनेलिंग पद्धतीने होणार
- मुंबईत पावसाळ्या निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी 53.71 कोटींची तरतूद
- मॅनहोलमध्ये पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी मॅनहोलमध्ये 1450 जाळ्या बसवणार, 1.22 कोटींची तरतूद
- मुंबईतील नद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता 25 लाखांची तरतूद
- सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी - 50.70 कोटी
- उद्यान खात्यांसाठी – 243 कोटींची तरतूद
- देवनार डंपिंग ग्राऊंड इथे कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी 110 कोटी
- मुलुंड डंपिंग ग्राऊंड कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी 65 कोटी
- उद्यान विभागासाठी 243 कोटी
- तानसा पाईपलाईन शेजारील सायकल ट्रॅकसाठी 100 कोटी
- मलनिःसारण सुधारणांसाठी 119 कोटी
- रस्त्यांसाठी 2058 कोटींची तरतूद असून त्यातील सिमेंट रस्त्यांसाठी 434 कोटी तर डांबरी रस्त्यांसाठी 590 कोटी
- महापालिकेच्या मंड्यांमध्ये ऑर्गेनिक कन्व्हर्टरची उभारणी करण्यात येईल, 12 कोटींची तरतूद
- ओसी नसलेल्या पुनर्वसित इमारतींना जलजोडणी दिली जाणार
- नवीन विकास आराखडा अंमलबजावणीसाठी 2665 कोटींची तरतूद
- नवीन पूल बांधणीसाठी 467 कोटी
- 55 ठिकाणची पूर प्रवण स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 53.71 कोटींची तरतूद
- मिठी नदी सुधारणेसाठी 15 कोटी
- प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या रोगाचं निदान करण्यासाठी प्रयोगशाळा आणि विशेष दवाखाने सुरु करणार, 1 कोटींची तरतूद
- भटके श्वान, मांजरं, पाळीव प्राणी यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईत प्रथमच शव दाहिनीची सुविधा
- आपत्कालिन व्यवस्थापन – 11.69 कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement