एक्स्प्लोर

ब्लॉग माझा स्पर्धा 2016

नमस्कार ब्लॉगर्स,   मधल्या काळात फेसबुक आणि ट्विटरमुळे असं वाटलं होतं की ब्लॉगिंग आणि त्यातही मराठी ब्लॉगिंगचं काय होणार? पण, उलट ही माध्यमं ब्लॉगिंगला पूरकच ठरतायत. मराठी ब्लॉगिंगचं क्षितीजही विस्तारतंय. विविध विषयांना धीटपणे भिडताना मराठी ब्लॉगर्स दिसत आहेत. फक्त स्फूट लेखनंच नाही तर, कविता, फोटो, कथा असेही प्रकार हाताळले जात आहेत. अशाच मराठी ब्लॉग्ज आणि ब्लॉगर्सचं कौतुक ‘ब्लॉग माझा’ या मराठीतल्या एकमेव ब्लॉगिंग स्पर्धेच्या रूपानं एबीपी माझा करत आहे.   दरवर्षीप्रमाणे यंदाही एबीपी माझातर्फे ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.   तेव्हा मंडळी तुमच्यात दडलेल्या लेखक / लेखिकेला केवळ डायरी, फेसबुक किंवा ट्विटर पुरताच मर्यादित ठेवू नका. या स्पर्धेत भाग घ्या. ब्लॉगवर नियमित लिहित असाल तर ठिकच, नाही तर ब्लॉग अपडेट करा. ब्लॉग नसेल तर या स्पर्धेच्या निमित्तानं सुरू करा.   काय म्हणालात? बक्षिसांचं काय? अहो, बक्षीसं आहेतंच की! पहिल्या पाच जणांना विशेष पारितोषकं आणि उर्वरीत दहा जणांचा उत्तेजनार्थ गौरव. आता कोणती बक्षीसं आहेत ते गुपित राहू द्या की! शिवाय, तुमच्या निवडलेल्या ब्लॉगला ‘एबीपी माझा’च्या वेबसाईटवर प्रसिद्धी दिली जाईल आणि ‘एबीपी माझा’च्या डिजिटल महाराष्ट्र या खास कार्यक्रमात ब्लॉग माझा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल आणि याच कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील.   …..तेव्हा मित्र-मैत्रिणींनो येऊ द्या तुमच्यातल्या लेखक-लेखिकेला जगासमोर!  

स्पर्धेचं स्वरूप आणि नियम :

  • ब्लॉग मराठीतच आणि युनिकोड फॉन्टमध्ये लिहिलेला हवा.
 
  • 18 वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.
 
  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी blogmajha@abpnews.in या ई-मेल अँड्रेसवर ई-मेल करावा. ज्यात, तुमचं नाव, तुमच्या ब्लॉगची लिंक, पत्ता, व्यवसाय, दूरध्वनी क्र, मोबाईल क्र, व ई-मेल द्यावा. ई-मेल अँड्रेस देणं अनिवार्य आहे.
 
  • स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना तुम्ही फक्त तुमच्या ब्लॉगची लिंक पाठवणं अपेक्षित आहे. तुमचा ब्लॉग लेख स्वरूपात पाठवू नका. तसंच तुमच्या ब्लॉगवरील मजकूर अद्ययावत असायला हवा.. म्हणजे तुमचा ब्लॉग अपडेट नसेल तर ती प्रवेशिका ग्राह्य होणार नाही.
 
  • या स्पर्धेसाठी कोणतंही शुल्क नाही.
 
  • एकावेळी एका स्पर्धकाला फक्त एकच ब्लॉग पाठवता येईल.
 
  • ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख बुधवार, 10 ऑगस्ट 2016
 
  • स्पर्धेचा निकाल ऑगस्ट 2016 च्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल. तसंच, संबंधित विजेत्यांनाच फक्त ई-मेलद्वारे निकाल कळवला जाईल.
 
  • यानंतर ‘एबीपी माझा’च्या डीजिटल महाराष्ट्र या खास कार्यक्रमात ब्लॉग माझा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल आणि याच कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
 
  • स्पर्धेचं आयोजन, नियमावली, अटी, बक्षीसं यासंदर्भात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार ‘एबीपी माझा’कडे असतील.
 
  • ब्लॉगमधला कंटेंट स्वत:चाच असावा. जर अन्य स्त्रोतांकडून माहिती घेतली असेल, तर त्यांचा नाममिर्देश करावा. ब्लॉग व त्यातील मजकूर आपलाच असल्याचे सिद्ध करणे, ही स्पर्धकाची जबाबदारी आहे. तुमच्या ब्लॉगद्वारे बौद्धिक संपदा अधिकार, कॉपीराईट कायदा यांचा भंग झाल्यास, उचलेगिरी आढळल्यास त्या ब्लॉगरचा स्पर्धेतला सहभाग व पारितोषिक मिळाल्यास तेही रद्द करण्यात येईल.
 
  • सर्वोत्तम ब्लॉग निवडण्याचे अधिकार पूर्णत: परिक्षक आणि स्पर्धा संयोजकांकडे असतील. त्याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देण्यास परिक्षक, संयोजक, ‘एबीपी माझा’ हे बांधील नसतील. तुमच्या एन्ट्रीज या तुम्हाला अटी मान्य असल्याच्या निदर्शक असतील.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरीAmeya Khopkar : पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' प्रदर्शित होऊ देणार नाही, अमेय खोपकरांचा इशाराSpecial Report Waqf Amendment Billवक्फ सुधारणा विधेयक सादर,जुन्या आणि नव्या कायद्यातील मोठे बदल काय?Zero Hour | 'वक्फ' धर्माचा नाही तर संपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा, मग विधेयकाला विरोध का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
Embed widget