एक्स्प्लोर
Advertisement
युतीबाबतच्या निर्णयासाठी 21 जानेवारीपर्यंतची डेडलाईन
मुंबई: भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील युतीच्या चर्चेसंबंधी पहिली बैठक आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावर पार पडली. मात्र, या बैठकीत जागा वाटपावर काहीही चर्चा झाली नसून केवळ पारदर्शी कराभारावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. मात्र, युतीबाबत अंतिम निर्णय 21 जानेवारीपर्यंत घेण्यात यावा असं या बैठकीत ठरलं असल्याचं समजतं आहे.
बैठकीनंतर शिवेसेनचे खासदार अनिल देसाई यांनी याबाबत सांगितलं की, 'पहिल्या फेरीत प्राथमिक स्वरुपाची बोलणी झाली. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे काही मुद्यांवर चर्चा करतील. त्यानंतर चर्चेची दुसरी फेरी उद्या दुपारी होण्याची शक्यता आहे.' असं देसाई म्हणाले.
दरम्यान, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. असं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. काही मुद्द्यांवर वरिष्ठ पातळीवरच चर्चा होईल. मात्र आजच्या बैठकीत आकड्यांबाबत काहीही चर्चा झाली नसल्याचं शेलार यांनी स्पष्ट केलं.
युतीबाबत किमान 21 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय घ्यावा असं आजच्या बैठकीत ठरलं. कारण, 27 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेसाठी भाजप-शिवसेनेच्या हातात अजून पाच दिवस शिल्लक आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement