किरीट सोमय्यांचा भावना गवळींवर हल्लाबोल, म्हणाले, 'गवळींच्या कार्यालयातून 7 कोटी नगदी चोरी कशी?'
शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. किरीट सोमय्या यांनी पुण्यात गवळी यांच्यावर आरोप केल्यानंतर आता ट्वीट करत एक नवा आरोप केला आहे.
मुंबई :शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. किरीट सोमय्या यांनी पुण्यात गवळी यांच्यावर आरोप केल्यानंतर आता ट्वीट करत एक नवा आरोप केला आहे. भावना गवळी यांच्या कार्यालयातून पहाटे 5 वाजता ₹7 कोटी रोख नगदी चोरी? असा सवाल त्यांनी ट्वीट करत केला आहे. शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत 7 जुलै 2019 रोजी सकाळी 5 वाजता 7 कोटी नगदी रोख 11 लोकांनी चोरले अशी तक्रार 12 मे 2020 रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली आहे. एवढी रोख रक्कम आली कुठून? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांची काही लोकांकडून दिशाभूल; Bhavana Gawali यांचं स्पष्टीकरण
खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे 5 वाजता ₹7 कोटी रोख नगदी चोरी?
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 16, 2021
शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत 7/7/2019 रोजी सकाळी 5 वाजता ₹7 कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली
एवढी रोख रक्कम आली कुठून? pic.twitter.com/0nBngqhWrx
नुकतंच सोमय्या यांनी पुण्याच्या मावळमध्ये पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर आरोप केले होते. गवळी यांनी केंद्र, राज्य सरकारसह बँकेचे रक्कम लाटली असा आरोप सोमय्यानी केला होता. हा गैरव्यवहार कसा केला, हे सोमवारी मुंबईत पुराव्यासह समोर आणणार असं ही सोमय्यानी जाहीर केलं होतं.
महामार्गांच्या कामात शिवसैनिकांचा उपद्रव, कार्यकर्त्यांना सांभाळा उद्धवजी, नितीन गडकरींचं पत्र
दरम्यान यावर बोलताना भावना गवळी यांनी म्हटलं आहे की, काही लोकांचं षडयंत्र आहे आमच्याविरोधात. जाणून बुझुन शिवसेनेवर आरोप करतात. जे आरोप करतात त्यांनी माझ्यासमोर बसून मला सांगावं हे असं काय झालंय, असं गवळी म्हणाल्या. सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची काही लोकांकडून दिशाभूल होत असल्याचे शिवसेना खासदार भावना गवळींनी स्पष्टीकरण दिले होते. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात काही शिवसैनिक त्रास देत असल्याची तक्रार मंत्री नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याच पत्राच्या अनुषंघाने खासदार भावना गवळींनी गडकरींना स्पष्टीकरण दिले आहे.