औरंगाबाद अत्याचार प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबादमधील खाजगी शिकवणी घेणार्या 29 वर्षीय तरुणीने केला आहे.
औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबादमधील खाजगी शिकवणी घेणार्या 29 वर्षीय तरुणीने केला आहे. "माझ्यावर अत्याचार करणारा व्यक्ती हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हेच आहेत. आता मला जे काही बोलायचं आहे ते कोर्टात बोलेन," असं तरुणीने म्हटलं आहे. मेहबूब शेख यांनी त्यांच्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळले होते, त्यावर तरुणीने आपली बाजू मांडली आहे. या प्रकरणात आता भाजपने उडी घेतली असून औरंगाबाद अत्याचार प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
26 डिसेंबरला एका तरुणीने राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुक शेख यांच्या विरोधात अत्याचाराची तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करताना वेळकाढूपणा करत आहेत. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज सकाळी धक्कादायक बातमी आली. ज्या तरुणीने ही तक्रार दिली होती ती गायब आहे. कालच्या स्टेटमेंटमध्ये पीडितीने स्पष्ट म्हटलं आहे, की आता मला जे काय म्हणायचे आहे ते पोलिसांसमोर म्हणणार नाही कोर्टासमोर मांडेल.
या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. एका बाजूला तपास चालू असताना दीपक गिर्हे नावाचे डीसीपी या प्रकरणात आरोपी विरोधात कुठलेही सबळ पुरावे नाहीत असा बेजबाबदार वक्तव्य केलं. यामुळे पीडितेवर आणि तिच्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओच्या माध्यमातून मला त्या तरुणीला सांगायचं की तुझा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही आहोत? ज्यांनी असं चुकीचं केलं आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे.
काय आहे प्रकरण? राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबाद शहरातील 29 वर्षीय तरुणीने केला आहे. या तरुणीचे बीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. तिच्या आरोपानुसार, "ती घरगुती शिकवणी घेते. त्या तरुणीला औरंगाबाद शहरातील बायपास परिसरात शिकवणी सुरु करायची असल्याने ती तिथे खोली भाड्याने घेण्यासाठी आली. त्याठिकाणी तिची भेट बीड जिल्ह्यातील शिरुर कासारमधील महबूब इब्राहिम शेख यांच्याशी झाली. त्यानंतर शिक्षण किती झाले असं विचारुन तुला मुंबईत नोकरी लावतो असे आमिष मेहबूब शेख यांनी दाखवलं. 14 नोव्हेंबर रोजी मुंबईला जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेलसमोर पोहोचले असता मेहबूब कार घेऊन त्या ठिकाणी उभे होते. तरुणी मागील सीटवर बसवून गाडी सुरु केली. यानंतर वसंतराव नाईक कॉलेजजवळ निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून तर अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्यता केली तर तुला सोडणार नाही असे म्हणून तिला कारमधून उतरवले. या घटनेनंतर तरुणीच्या मावशीने धीर दिल्यानंतर तिने सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
संबंधित बातमी :