एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपच्या डॉ. कविता चौतमल पनवेलच्या पहिल्या महापौर
नवी मुंबई : पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौरपदाचा बहुमान भाजपच्या डॉ. कविता चौतमल यांना मिळाला आहे. तर उपमहापौरपदाचा मान माजी नगराध्यक्षा चारुशिला घरत यांना मिळाला आहे. ऐनवेळी शेकाप आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
पनवेल महापालिकेत 78 पैकी भाजपचे 51 तर शेकाप आघाडीचे 27 असे संख्याबळ आहे. भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. पण तरीही शेकाप आघाडीकडून महापौरपदासाठी हेमलता गोवारी आणि उपमहापौपदासाठी रवींद्र भगत यांनी अर्ज दाखल केले होते.
शेकाप आघाडीच्या उमेदवारांनी या निवडणुकीत अर्ज भरल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता होती. मात्र, ऐनवेळी शेकाप आघाडीच्या उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
महापौर डॉ.कविता चौतमल या उच्चशिक्षित असून व्यवसायाने डॉक्टर आहेत. तर उपमहापौर चारुशिला घरत यापूर्वी पनवेलच्या नगराध्यक्षा होत्या.
पनवेलच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी महापौर डॉ. कविता चौतमल यांनी सांगितलं. दरम्यान, स्वीकृत नगरसेवकांमध्ये भाजपाचे तीन आणि शेकाप महाआघाडीचे दोन सदस्यांची निवड झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement