एक्स्प्लोर
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी भूषण धर्माधिकारींची नियुक्ती
प्रभारी मुख्य न्यायमूर्तींनाच मुख्य न्यायमूर्ती बनवण्याची नजीकच्या काळातील दुसरी वेळ आहे. फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या कोलीजिअम म्हणजेच न्यायवृंदाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी भूषण धर्माधिकारी यांच्याच नावाची शिफारस करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या कोलीजिअम म्हणजेच न्यायवृंदाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची एक दिवसापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे 24 तासांच्या आतच त्यांनाच या हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती बनवण्यासाठीची शिफारस करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजिअमनं घेतला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून प्रदीप नंदराजोग हे नुकतेच सेवानिवृत्त झालेत. तसेच त्यांच्या खालोखाल मुंबई उच्च न्यायालयात सर्वात ज्येष्ठ असलेले सत्यरंजन धर्माधिकारी यांनी आपल्या सेवेतील दोन वर्ष शिल्लक असताना तडाफडकी राजानीमा दिल्यानंतर त्यांचेच ज्येष्ठ चुलत बंधू न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची सेवाज्येष्ठतेनुसार या पदावर नियुक्ती करण्यात आली.
मालेगाव बॉम्बस्फोट : सहा महिन्यांत केवळ 14 जणांची साक्ष; हायकोर्टाचे NIA ला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती -
मूळचे नागपूरचे असलेले न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी नागपूर विद्यापीठातून बी.एस.सी.(जीवशास्त्र), अतिरिक्त बी. ए. इंग्रजी साहित्यात आणि एल.एल.बी. बी.एस्सीचे शिक्षण घेतले आहे. 1980 साली विधी शाखेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागपुरातच कायद्याचा सराव सुरू केला. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर मध्ये अॅड. वाई. एस. धर्माधिकारी यांच्याकडे काही काळ काम केले. पुढे 2004 साली हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून तर 2006 साली न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
Nirbhaya Rapist Death Sentence | दिल्ली निर्भया बलात्काराप्रकरणी चारही दोषींना एकत्र फाशी देणार - दिल्ली हायकोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement