एक्स्प्लोर
Balasaheb Thackeray | राष्ट्रवादीच्या नेत्याचं बाळासाहेबांना अभिवादन
बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली आहे. तर छगन भुजबळ आणि जयंत पाटलांनी शिवाजी पार्कात जाऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं.
मुंबई : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये पोहोचले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी छगन भुजबळांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
दिवसातून एकदा तरी बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेबांना शिवसेनेत असताना 25 वर्ष जवळून पाहता आलं. शिवसेनेत असताना अनेक आंदोलनं बाळासाहेबांच्या नेतृत्वात केली, या आंदोलनांमध्ये मी प्रत्यक्ष सहभागी झालो होतो. या सर्वांचा मी साक्षीदार आहे. राज्यात लवकरच महाशिवआघाडीची सत्ता स्थापन होईल. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, असा शब्द उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिला होता. त्यांचा शब्द खरा करण्यासाठी आपण प्रयत्न करु, असं भुजबळांनी सांगितलं.
बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्विटरवरुनही श्रद्धांजली अर्पण केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली आहे. "प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला. समाजकारणाला अग्रक्रम देणारं राजकारण, अमोघ वक्तृत्व, रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!", असं ट्वीट शरद पवारांनी केलं आहे.
प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला. समाजकारणाला अग्रक्रम देणारं राजकारण, अमोघ वक्तृत्व, रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन! pic.twitter.com/9YO1YX3rsp
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 17, 2019
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं. "स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला. आमचे प्रेरणास्थान, हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी शत शत प्रणाम", असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलं.महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथि. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. pic.twitter.com/6sgue9fejy
— Supriya Sule (@supriya_sule) November 17, 2019
आमचे प्रेरणास्थान, हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी शत शत प्रणाम ! pic.twitter.com/8DG9Deyydk
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement