Mumbai News : मुंबईची हवा खराब! मान्सून माघारी फिरल्यानंतर हवेची गुणवत्ता खालवली
Mumbai Air Quality : मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली. मान्सून माघारी फिरल्यानंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता खालवली असल्याचं समोर आलं आहे.
Mumbai Air Quality : राज्यातून नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु आहे. मुंबईतून मान्सून माघारी फिरल्यानंतर हवा गुणवत्ता खालवली असल्याचं समोर आलं आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा परिणाम तापमानावर होताना दिसत आहे. मान्सूनमुळे एकीकडे मुंबईसह राज्यात काही ठिकाणी तापमान वाढल्याचं पाहायला मिळत असताना हवेचा दर्जाही खालावला आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली
मान्सून माघारी फिरल्यानंतर मुंबईतील हवा गुणवत्ता खालवली आहे. मुंबईती हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीतून मध्यम श्रेणीत घसरली आहे. मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक 114 पर्यंत खालवला आहे. माझगाव, कुलाबा आणि नवी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक ‘वाईट’ श्रेणीत पोहोचली आहे. मुंबईचा एक्यूआय मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 3 ऑक्टोबरला 146 वर होता.
मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ
कुलाब्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 294 वर, माझगावात हवा गुणवत्ता निर्देशांक निर्देशांक 206 वर तर नवी मुंबईतील एक्यूआय 214 वर आहे. कुलाबा, माझगाव आणि नवी मुंबईत पीएम 2.5 कणांची मात्रा अधिक आहे. माझगाव परिसरातील आणि कुलाबा परिसरात समुद्री वाहतूक, जड वाहनांच्या वाहतुकीमुळे परिणाम तर बांधकाम आणि धुळीच्या कणांमुळे मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ झाल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे, मुंबई पुन्हा एकदा प्रदूषणाच्या (Mumbai Pollution) विळख्यात अडकली आहे.
अंधेरी एक्यूआय (AQI) 125 वर, चेंबूर परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 156, बीकेसीतील एक्यूआय 106, बोरीवलीतील एक्यूआय 112 वर घसरला आहे. तसेच, वरळी आणि भांडूप परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक स्थितीत आहे. वरळीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 76 तर, भांडूपमधील एक्यूआय 84 वर पोहोचला आहे.
हवेची गुणवत्ता
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक्यूआय 0-50 मधील चांगले, 51 आणि 100 मधील समाधानकारक, 101 आणि 200 दरम्यान मध्यम, 201 आणि 300 दरम्यान गरीब, 301 ते 400 मधील अत्यंत गरीब आणि 400 पेक्षा जास्त गंभीर म्हणून वर्गीकृत केला आहे.
ऑक्टोबरमध्ये उन्हाचा चटका
ऑक्टोबर (October) महिन्यात कमाल तापमानात वाढ (Temperature Increase) होणार आहे. देशभरात (India Weather) ऑक्टोबर महिन्यात 'उष्णतेची लाट' (Heat Wave) येणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात देखील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, ऑक्टोबर हिटचे चटके बसणार आहेत, अशी शक्यता आयएमडी (IMD) ने वर्तवली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :