लेक अन् बायकोशी फोनवर तासभर बोलला, कर्जाला कंटाळून फाॅरेन रिटर्न इंजिनिअरने अटल सेतूवरून समुद्रात घेतली उडी
Mumbai Crime: कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकानं अटल सेतूवरून उडी टाकून आत्महत्या केली. या व्यावसायिकानं आत्महत्येपुर्वी मुलीला फोन केला आणि थेट उडी मारून आपलं आयुष्य संपवलं.
मुंबई : मुंबईच्या (Mumbai News) अटल सागरी सेतूवरुन (Atal Setu) एका व्यक्तीची समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती 38 वर्षांची असून इंजिनीअर आहे. न्हावा शेवा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा नोंद झालेली ही दुसरी घटना आहे. ही घटना सेतूवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 20 मार्च रोजी एक महिला डॉक्टरने देखील अटल सेतूवरून आत्महत्या केली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास कुरुकुट्टी (38) असे आत्महत्या करणाफ्या व्यक्तीचे नाव आहे. नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. श्रीनिवास काही दिवसांपूर्वी कुवैतहून भारतात आले होते . भारतात आल्यानंतर ते डोंबिवलीत वास्तव्यास होते. श्रीनिवास कुरुकुट्टी कुवैत येथील एका खासगी कंपनीत काम करत होते.इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर म्हणून काम कर त असलेल्या श्रीनिवास यांनी ऑक्टोबर 2023 मध्येच कुवैत येथील जॉब सोडून डोंबिवलीतच आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता.मात्र व्यवसायात आलेल्या आर्थिक अडचणींमुळे श्रीनिवास वैफल्यग्रस्त झाले होते.
अटल सेतूवर नेमके काय घडले?
श्रीनिवास रात्री साडे अकराच्या सुमारास घराबाहेर पडले. मंगळवारी (24 जुलै) दुपारी 12.30 वाजता चारचाकी गाडीतून श्रीनिवास अटल सेतूवर आले होते. सेतूवर येताच चारचाकी पार्क करून इकडे तिकडे न पाहता थेट सेतूवरुन थेट खवळलेल्या समुद्रात उडी मारली .याआधीही कुवैतमध्ये काम करीत असतानाही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
2023 मध्ये केला होता आत्महत्येचा प्रयत्न
मृत श्रीनिवास यांच्या पश्चात पत्नी आणि चार वर्षाची मुलगी आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नी आणि मुलीशी फोनवर साधारण तासभर फोनवर बोलले. आर्थिक समस्या, डोक्यावरील कर्जाचा भार या कारणाने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2023 साली देखील श्रीनिवास यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कुवैतला असताना बाथरुममध्ये फिनाईल पिऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
शोधकार्यात अडथळे
श्रीनिवास यांचा चार मच्छिमार बोटी, सागरी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने शोध सुरू आहे.मात्र खवळलेला समुद्र आणि खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.त्यामुळे शोधमोहीमेला अद्यापही यश मिळाले
हे ही वाचा :
Mumbai Crime: "सॉरी बेटा, काळजी घे", बापाचा लेकाला शेवटचा फोन; त्यानंतर वरळी सी-लिंकवरुन स्वतःला झोकून दिलं