Maharashtra Exit Poll 2024 | विधानसभा निवडणुकीचा Exit Poll, कुणाला किती जागा मिळणार? ABP Majha
Maharashtra Exit Poll 2024 | विधानसभा निवडणुकीचा Exit Poll, कुणाला किती जागा मिळणार? ABP Majha
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. या सबबेनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील, मराठा आरक्षण आणि गौतमी अदानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली. गौतम अदानी यांच्याबाबत मी केलेल्या वक्तव्याचा ध चा मा केला जात आहे. त्यांचा राजकारणाचा काडीमात्र संबंध नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, मराठवाड्यात आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इथे निजामशाही होती, अनेक वर्ष निजामशाही असल्यामुळे इथे कुंणबी प्रमाणपत्र दिले गेले नव्हते, असे अजित पवार यांनी म्हटले. राज्यातील विधानसभा निडणुकांमध्ये काही राजकीय पक्ष जरांगे पाटील यांच्या नावाचा वापर करत असल्याचा प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील हे त्यांची भूमिका मांडण्यासाठी सक्षम आहेत, असे ते म्हणाले.