Mumbai Crime: "सॉरी बेटा, काळजी घे", बापाचा लेकाला शेवटचा फोन; त्यानंतर वरळी सी-लिंकवरुन स्वतःला झोकून दिलं
Mumbai Crime: कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकानं वरळी सी-लिंकवरुन उडी टाकून आत्महत्या केली. या व्यावसायिकानं आत्महत्येपुर्वी मुलाला फोन करुन आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आणि थेट सिलिंकवरुन उडी मारून आपलं आयुष्य संपवलं.
Mumbai Crime News: मुंबई : कर्जबाजारीपणाला कंटाळून मुंबईतील (Mumbai News) एका व्यावसायिकानं वरळी सी-लिंकवरून (Worli Sea Link) उडी घेत आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्येपूर्वी व्यावसायिकानं मुलाला फोन करून आत्महत्येची कल्पना दिली होती. भावेश सेठ असं या व्यावसायिकाचं नाव असून त्याचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय असल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच भाईंदरमध्ये (Bhayandar) डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढल्यानं बाप-लेकानं हातात हात धरुन ट्रेनखाली जात आपलं आयुष्य संपवलं होतं. अशातच आता आणखी एका आत्महत्येच्या घटनेनं मुंबई हादरली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकानं वरळी सी-लिंकवरुन उडी टाकून आत्महत्या केली. या व्यावसायिकानं आत्महत्येपुर्वी मुलाला फोन करुन आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आणि थेट सिलिंकवरुन उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. भावेश सेठ असं या व्यावसायिकाचं नाव असून त्याचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय होता.
व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या भावेशनं नैराक्षतून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीकडे भावेशनं सि-लिंकपर्यंत लिफ्ट मागितली. सिलिंकवर उतरल्यानंतर आत्महत्येपूर्वी भावेशनं मुलगा स्मिथ सेठ (28) याला फोन करून त्याची माफी मागत आपण आतमहत्या करत असल्याची कल्पना दिली. सी-लिंकवरील कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती पोलिसांना दिली. जवळ असलेले मच्छिमार पोलिसांची वाट न पाहता सेठ याच्या मदतीला धावले.
सेठ यांना उपचरासाठी भाभा रुग्णालयात नेलं असता. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांना आत्महत्या केलेल्या जागेवर एक सुसाईड नोटही सापडली आहे. त्यात 'सॉरी बेटा सर्व काही गोष्टींसाठी, कुटुंबाची काळजी घे' असे म्हटले आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.