एक्स्प्लोर

Cruise Drug Case : ...तर आर्यन खानची दिवाळी तुरुंगातच जाणार!

Aryan Khan Bail Plea Hearing : मुंबई उच्च न्यायालयानं जामीन नाकारल्यास आर्यन खानची दिवाळी तुरुंगातच जाण्याची शक्यता आहे.

Aryan Khan Bail Plea Hearing : मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी अटकेत असणारा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा  आर्यन खान (Aryan Khan) गेल्या 18 दिवसांपासून कारागृहात आहे. काल (बुधवारी) विशेष एनडीपीएस कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. आर्यन खानच्या या याचिकेवर आज सुनावणी होऊ शकते. पण, मुंबई उच्च न्यायालयानंही आर्यन खानची याचिका फेटाळली तर मात्र, आर्यन खानची दिवाळी तुरुंगातच जाण्याची शक्यता आहे. 

आर्यनच्या वकिलांकडे 30 ॲाक्टोबर पर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर 12 दिवस कोर्टाला दिवाळीची सुटी असणार आहे. जर या 7 दिवसांत कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टानं आपला निर्णय दिला नाही तर, आर्यन खानला दिवाळीमध्येही जेलमध्येच रहावे लागेल. कोर्टात एनसीबीने आर्यनचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीयाशी असल्याचा आरोप करत एनडीपीएस अॅक्टच्या कलम 29 अ अंतर्गत आर्यनच्या जामीनाला विरोध केला जो कोर्टाने मान्य केला. एनसीबीला आर्यन खानच्या विदेशी दुव्यांचा संशय आहे. आर्यन खानला एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी अटक केली. एनसीबीला आर्यन खानकडून ड्रग्ज किंवा रोख रक्कम मिळाली नाही. कोर्टात एनसीबीने म्हटले होते की, आर्यन खान अरबाज मर्चंटकडे सापडलेल्या ड्रग्जचं सेवन करणार आहे. एनसीबी आर्यन खानचे ड्रग्ज चॅट, परदेशी लिंक्सचे पुरावे असल्याचा दावा करत आहे. एनसीबीने युक्तिवादात आर्यन खानच्या ड्रग्ज चॅटचा ही उल्लेख केला, ज्यात तो परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागताना दिसला होता. एनसीबीला आर्यनने ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा संशय आहे.

आर्यनचा जामीन अर्ज विशेष एनडीपीएस कोर्टानं फेटाळला 

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आजही सत्र न्यायलयाकडून दिलासा मिळाला नाही. क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला सध्या आर्थर रोड जेलमध्ये राहावं लागणार आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. आज न्यायालयात कोणताही युक्तिवाद झाला नाही. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या वकिलांनी यापूर्वीच पूर्ण केले होते. सुनावणी पूर्ण झाल्यावर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. न्यायाधीशांनी कोर्टात आल्यावर थेट निर्णय जाहीर केला.आर्यन खानच्या वकीलांनी आज मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. आर्यन खानच्या वकिलांना निकालाची तपशीलवार प्रत मिळताच त्यांनी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यापुढे जामीन अर्ज सादर केला आणि गुरूवारी म्हणजे उद्याच तातडीची सुनावणी घेण्याचा विनंती अर्जही सोबत दाखल करण्यात आला आहे. आर्यन खानचे वकील, बचाव पक्षाचे म्हणणे आहे की अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळतो, परंतु या प्रकरणात असे झाले नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! अखेर शिवसेना पदाधिकाऱ्याची कार तलावातून बाहेर, काळं जॅकेट अन् पांढरा हेडफोन मिळाला
मोठी बातमी ! अखेर शिवसेना पदाधिकाऱ्याची कार तलावातून बाहेर, काळं जॅकेट अन् पांढरा हेडफोन मिळाला
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रियाNamdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्ते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! अखेर शिवसेना पदाधिकाऱ्याची कार तलावातून बाहेर, काळं जॅकेट अन् पांढरा हेडफोन मिळाला
मोठी बातमी ! अखेर शिवसेना पदाधिकाऱ्याची कार तलावातून बाहेर, काळं जॅकेट अन् पांढरा हेडफोन मिळाला
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
Embed widget