Shahrukh Khan : शाहरुख खाननं घेतली मुलाची भेट, आर्थर रोड कारागृहात दहा मिनिटांचा संवाद
आर्यन खान आणि इतर दोघांचा जामीन अर्ज काल कोर्टानं फेटाळला, आज आर्यनची भेट घेण्यासाठी शाहरुख खान स्वत: आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला.
Aryan Khan Cruise Drug Case : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा अर्ज काल सत्र न्यायालयाकडून फेटाळला गेला. त्यानंतर आज आर्यनची भेट घेण्यासाठी शाहरुख खान स्वत: आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. शाहरुखनं दहा मिनिटं आर्यनशी संवाद केला. कालही जामीन अर्ज फेटाळल्यानं क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये राहावं लागणार आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज काल मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. काल न्यायालयात कोणताही युक्तिवाद झाला नाही. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या वकिलांनी यापूर्वीच पूर्ण केले होते. सुनावणी पूर्ण झाल्यावर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. न्यायाधीशांनी कोर्टात आल्यावर थेट निर्णय जाहीर केला होता.
#WATCH Actor Shah Rukh Khan reaches Mumbai's Arthur Road Jail to meet son Aryan who is lodged at the jail, in connection with drugs on cruise ship case#Mumbai pic.twitter.com/j1ozyiVYBM
— ANI (@ANI) October 21, 2021
आर्यन खानच्या वकीलांनी काल मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. आर्यन खानच्या वकिलांना निकालाची तपशीलवार प्रत मिळताच त्यांनी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यापुढे जामीन अर्ज सादर केला आणि गुरूवारी म्हणजे आज तातडीची सुनावणी घेण्याचा विनंती अर्जही सोबत दाखल करण्यात आला होता.
आर्यनच्या वकिलांसमोर 30 ॲाक्टोबर पर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर 12 दिवस कोर्टाला दिवाळीची सुटी असणार आहे. जर या 7 दिवसांत कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टाने आपला निर्णय दिला नाही तर, आर्यन खानला दिवाळीपर्यंत जेलमध्येच रहावे लागेल. कोर्टात एनसीबीने आर्यनचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीयाशी असल्याचा आरोप करत एनडीपीएस अॅक्टच्या कलम 29 अ अंतर्गत आर्यनच्या जामीनाला विरोध केला जो कोर्टाने मान्य केला. एनसीबीला आर्यन खानच्या विदेशी दुव्यांचा संशय आहे. आर्यन खानला एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी अटक केली. एनसीबीला आर्यन खानकडून ड्रग्ज किंवा रोख रक्कम मिळाली नाही. कोर्टात एनसीबीने म्हटले होते की, आर्यन खान अरबाज मर्चंटकडे सापडलेल्या ड्रग्जचं सेवन करणार आहे. एनसीबी आर्यन खानचे ड्रग्ज चॅट, परदेशी लिंक्सचे पुरावे असल्याचा दावा करत आहे. एनसीबीने युक्तिवादात आर्यन खानच्या ड्रग्ज चॅटचा ही उल्लेख केला, ज्यात तो परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागताना दिसला होता. एनसीबीला आर्यनने ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा संशय आहे.
एनसीबीने न्यायालयात आर्यनच्या जामिनाला कडाडून विरोध केला होता. ते म्हणाले की, आरोपीला जामीन दिल्याने पुरावे नष्ट केले जाण्याची भिती आहे. एनसीबीकडून आर्यन खानचे आंततराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचेही दावे केले गेले. आर्यन खान कारागृहात खूप तणावात राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जोपर्यंत ते क्वारंटाईनमध्ये वेगळे राहत होते, तोपर्यंत ठीक होतं. पण सध्या आर्यन अन्य कैद्यांबरोबर राहत आहे. या पूर्वी आर्यन तुरुंगात मिळणारं जेवण करत नव्हता. आर्यन ते जेवण इतरांना द्यायचा. शाहरुख खानने मनिऑर्डरद्वारे पाठवलेल्या 4500 रुपयांमधून जेल कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ खात असल्याचं सांगितलं गेलं.