एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खोटे कागदपत्र बनवून गंडा घालणाऱ्या टोळीच्या हस्तकाला अटक
मुंबईतील दहा बड्या फायनान्स कंपन्यासोबत हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणांमध्ये दिवाकर जयस्वाल या आरोपीला अटक करण्यात आली असून आता त्याच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
मुंबई : मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्ष पथकाने फायनान्स कंपनी सोबत फ्रॉड करणाऱ्या एका टोळीच्या हस्तकाला अटक केली आहे. ही टोळी मुंबईतील नामांकित इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात जाऊन बजाज फायनान्स, रिलायन्स फायनान्स, कॅपिटल फर्स्ट, अशा विविध बड्या फायनान्स कंपन्यांच्या नावावर हप्त्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची आणि हप्ता न भरता ती वस्तू परस्पर विकून टाकायची आहे.
या टोळीने आतापर्यंत 15 लाखांपेक्षा अधिक आणि मुंबईतील दहा बड्या फायनान्स कंपन्यासोबत हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणांमध्ये दिवाकर जयस्वाल या आरोपीला अटक करण्यात आली असून आता त्याच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वी देखील या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच हा फ्रॉड करण्यासाठी जी खोटी कागदपत्र ते बनवायचे उदाहरणार्थ पॅन कार्ड, आधार कार्ड त्याची माहिती त्यांना कुठून मिळायची आणि ते डॉक्युमेंट्स त्यांना कोण पुरवायचं या सगळ्यांचा देखील शोध पोलीस करत आहे. ज्या लोकांचे डॉक्युमेंट यांनी फ्रॉड करण्यासाठी वापरलेले आहेत त्या लोकांना याची माहिती सुद्धां असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या टोळीने यांचे कागदपत्र दिले आहे ते खोटे आहेत का खरे याचा तपास देखील पोलीस करत आहेत.
वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 95 लाचखोर अधिकारी जाळ्यात, सर्वात जास्त लाचखोर पुण्यात | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement