एक्स्प्लोर
‘वर्षा’वरील कॅबिनेट बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी!

प्रातिनिधीक फोटो
मुंबई: मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलवलेली बैठक संपली आहे. या बैठकीला शिवसेनेचे सर्व कॅबिनेट मंत्री हजर होते. या कॅबिनेट बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
शिवसेना अजूनही कर्जमुक्तीच्या मुद्यावर ठाम असल्याचं शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीनंतर सांगितलं. राज्य सरकारची नेमकी काय भूमिका आहे याबाबत मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट करतील. उद्या (18 मार्च) मुख्यमंत्र्यांनी सदनात निवदेन दिल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करु.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवरुन परतताच आज (17 मार्च) कॅबिनेट बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्या (18 मार्च) सदनात सादर करण्यात येणारा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यानंतर बैठकीत याला मंजूरीही मिळाली.
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्री दिल्लीवरुन परतताच ‘वर्षा’वर कॅबिनेट बैठक
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
जळगाव
करमणूक
Advertisement
Advertisement


















