Torres Scam : विदेशी आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर, नेपाळमार्गे सीमकार्ड मागवली, फरार तौसिफ रियाजकडून धक्कादायक माहिती
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणी नवी माहिती फरार असलेल्या तौसिफ रियाजनं दिली आहे. यंत्रणांना 4 जानेवारीला सूचना दिली होती असं त्यानं वाटलं.
मुंबई : लाखो मुंबईकरांची टोरेस घोटाळ्याद्वारे फसवणूक करण्यात आली. या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास 1 हजार कोटी रुपयांची असण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यात फरार असलेल्या तौसिफ रियाज यानं एक मोठा दावा केला आहे. घोटाळ्याची जेव्हा माहिती मिळाली तेव्हा संबंधित यंत्रणांना 4 जानेवारीला माहिती दिली. घोटाळ्यासंदर्भातील पुरावे देखील दिल्याचं तौसिफ रियाजनं म्हटलं आहे. त्यानं स्वत :ला या प्रकरणात व्हिसल ब्लोअर म्हटलंय. मुंबईतील शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. टोरेस प्रकरणातील कथित घोटाळ्यावरील 182 पानांचा अहवाल एबीपी न्यूजला मिळाला आहे. ज्यामध्ये या प्रकारच्या 2019 मधील यूक्रेन आणि रशियातील B2B ज्वेलरी घोटाळ्यात असणाऱ्या लोकांनी टोरेस फसवणूक रॅकेट चालवल्याचा दावा केला आहे.
मुंबई, नवी मुंबई, मीरा रोड, सानपाडा येथील लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक टोरेस घोटाळ्यात झाली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. आर्थिक गुन्हे शाखा देखील या अहवालातील दाव्यांची तपासणी करत आहे. तौसिफ रियाजनं या प्रकरणाची माहिती यंत्रणाकंडे दिल्याची माहिती आहे. हे प्रकरण उघडकीस आणण्याचा सातत्यानं प्रयत्न केला असल्यानं त्याच्या जिवाला धोका असल्याचा दावा तौसिफ रियाजनं केला. टोरेस ज्वेलरी बिझनेसच्या आडून पाँझी योजना राबवली जाते, अशी माहिती यंत्रणांना दिली होती. ज्यामध्ये कर चोरी, अतिरिक्त खर्च आणि मनी लाँडरिंग सारख्या गैर प्रकाराचा समावेश होता, असा दावा तौसिफ रियाजनं यंत्रणांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
टोरेस स्कॅम B2B ज्वेलरी यूक्रेन आणि कैनकी ज्लेवरी (तुर्की) स्कॅमच्या योजनेच्या स्ट्रक्चर प्रमाण त्या लोकांकडून चालवलं जात होतं. तौसिफ रियाजनं ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि आगामी काळातील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी इन्कम टॅक्स, वित्तीय आणि दुसऱ्या यंत्रणांकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
तौसिफ रियाजनं यंत्रणांना कंपनीचे संचालक आणि शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केलेल्या सर्वेश सुर्वेनं लिहिलेलं पत्र यंत्रणांना दिलं आहे. रियाजनं दावा केला की सुर्वेनं देखील यंत्रणांना फसवणुकीसंदर्भात पत्र लिहिलं होतं, त्याच प्रमाणं पंतप्रधानांना देखील पत्र लिहिलं होतं.
बोगस ओळखपत्राआधारे सीम कार्ड मिळवली
रियाजनं त्याच्या पत्रात म्हटलं की,"प्लॅटिनम हर्न प्राइवेट लिमिटेडच्या अंतर्गत काम करणारी टोरेस कंपनी ज्वेलरी बिझनेसच्या नावाखाली पाँझी स्कीम आणि पिरॅमिड स्कीम चालवते. अस्थिर कॅशबॅक दरं, वाढलेला उत्पादन खर्च आणि रेफरल कमिशन ही व्यावसायिक रचना अस्थिर असल्याचं तौसिफ रियाजनं म्हटलं. टोरेसशी संबंधित विदेशी नागरिकांनी बोगस ओळखपत्रांचा वापर करुन मोबाइल क्रमांक घेतले. सीम कार्ड दलालांच्या माध्यमातून 12500 रुपयांना एक या हिशोबानं खरेदी केली होती. ती नेपाळच्या मार्गे मागवण्यात आली होती. 7 एप्रिल 2023 ला कंपनी भारतात स्थापन केली होती. सुर्वेनं त्या कंपनीत स्थापनेनंतर संचालक म्हणून काम केलं. यूक्रेनचा नागरिक ओलेना स्टोयन हा देखील संचालक होता.
सुर्वेनं म्हटलं की, कंपनी भारतात रिटेल ज्वेलरी बिझनेस व्यवसायात काम करेल, असं सांगितलं गेलं. विदेशी व्हिसा आणि रोजगार उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्या आधारे कंपनीचा संचालक आणि भागधारक झालो.
इतर बातम्या :
लाखो मुंबईकरांची टोरेसकडून फसवणूक, पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या