Rohit Pawar ED : नऊ तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर
Rohit Pawar ED : जवळपास नऊ तासांच्या ईडी कार्यालयातून बाहेर आले आहेत. रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले
Rohit Pawar ED : राष्ट्रवादीच्या शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे जवळपास नऊ तासांच्या ईडी कार्यालयातून बाहेर आले आहेत. रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. 24 जानेवारीलाही रोहित पवारांची ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा काही कागदपत्रांसह रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.
#WATCH | NCP-Sharad Pawar faction leader Rohit Pawar leaves from the ED office in Mumbai.
— ANI (@ANI) February 1, 2024
Rohit Pawar was summoned by the ED to appear before the agency today in connection with the Maharashtra State Cooperative (MSC) Bank scam case. pic.twitter.com/VIsEFtsZl2
25 हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकघोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने आमदार रोहित पवारांची तब्बल 11 तास चौकशी केली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्हाच्या आधारेच ईडीने ईसीआयआर दाखल करुन चौकशीला सुरुवात केली.
2022 मध्ये महायुतीच सरकार आलं आणि पोलिसांनी केस पुन्हा ओपन
हे प्रकरण 2019 वर्षातील आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पोलिसांनी अज्ञात माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि बँक संचालकांविरुद्ध 25,000 कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. प्रकरण नंतर EOW कडे वर्ग करण्यात आले. पण सत्ता परिवर्तन झालं आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं. त्यांनतर मुंबई पोलिसांनी 2020 साली पहिला क्लोजर अहवाल सादर करत अजित पवार आणि इतर नेत्यांना क्लिनचिट दिली. पण नंतर, 2022 मध्ये महायुतीच सरकार आलं आणि पोलिसांनी केस पुन्हा उघडण्यासाठी अर्ज दाखल केला.