एक्स्प्लोर

Mumbai Local Train: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, दर अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन, सीबीटीसी यंत्रणेमुळे मोठा दिलासा मिळणार

Mumbai Railway: मुंबईकर आता वेळेत कामावर पोहोचणार, लेटमार्कचं टेन्शन खल्लास होणार. सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल. 350 एसी लोकल ट्रेन सुरु होणार. दोन लोकलमधील वेळेचे अंतर कमी होणार

मुंबई: मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन शहरातील नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मुंबई उपनगर, ठाणे, अंबरनाथ, नवी मुंबई, बदलापूर परिसरातील बहुतांश चाकरमान्यांना आपले कार्यालय गाठण्यासाठी लोकल ट्रेनवर (Railway Train) अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मुंबईकरांचे (Mumbai News) आयुष्य लोकल ट्रेनच्या तालावर धावते, असे म्हटल्यासही वावगे ठरणार नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये लोकल ट्रेनचे (Mumbai Local Train) कोलमडणारे वेळापत्रक, तांत्रिक बिघाड आणि त्यामुळे प्रवाशांवर तासनतास ताटकळत राहण्याची वेळ येणे, हे चित्र सामान्य झाले आहे. परंतु, लवकरच हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील लोकल ट्रेन आता वेळेवर धावण्याच्यादृष्टीने एक नवीन यंत्रणा सुरु होणार आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी लोकल ट्रेनसाठीच्या नव्या प्रणालीविषयी भाष्य केले. रेल्वे मार्गावरील तांत्रिक अडचणी दूर करत तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेन्सना कवच प्रणालीबरोबर कम्बाईन कम्युनिकेशन्स बेस्ड कंट्रोल ट्रेन  कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणेशी जोडले जाणार आहे.  त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचे अंतर 180 सेकंदांवरुन 150 सेकंदांपर्यंत (अडीच मिनिटे) कमी होणार आहे.  अशाप्रकारची यंत्रणा लाभणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे. सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल  फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल, असा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून करण्यात आला. 

मुंबईकरांसाठी 350 नव्या एसी लोकल

मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी 350 नव्या एसी लोकल विकत घेण्यासंदर्भात रेल्वेकडून निविदा काढली जाणार आहे. मात्र, एसी ट्रेनला असणाऱ्या राजकीय विरोधामुळे ही प्रक्रिया थांबल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. मात्र, एसी ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या वाढत असल्याने उपनगरी रेल्वे मार्गावर एसी ट्रेन्सची संख्या वाढवण्यात येईल.

गणेशोत्सवामुळे आजचा मेगाब्लॉक रद्द

गणेशदर्शनानिमित्त रविवारी मुंबईत मोठ्याप्रमाणावर भाविक येणार असल्याने  मध्य रेल्वेने आजचा मेन लाईनवरचा नियमित मेगाब्लॉक रद्द केला आहे. तथापि, हार्बर मार्गावर मात्र सकाळी 9.40  ते सायंकाळी 4.51 या वेळेत दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

रविवारी ब्लॉकच्या काळात पनवेल येथून शेवटची लोकल सकाळी ९:४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटेल, तर ब्लॉकनंतरची पहिली पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सायंकाळी ४:५१ वाजता सुटेल. ब्लॉक कालावधीत कुर्ला- पनवेलदरम्यान २० मिनिटांनी विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

आणखी वाचा

ठाण्यातील खाडी पुलांच काम पूर्ण, मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ कमी होणार, विधानसभेपूर्वी रस्ता सुरु होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget