ठाण्यातील खाडी पुलांच काम पूर्ण, मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ कमी होणार, विधानसभेपूर्वी रस्ता सुरु होणार
Thane Khadi Coastal Road: एमएसआरडीसी हाती घेतलेल्या ठाणे खाडी पूल-3 प्रकल्पातील दक्षिणेकडील म्हणजेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे.
मुंबई: मुंबई-पुणे प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. कारण आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या ठाणे खाडी पूल-3 प्रकल्पातील दक्षिणेकडील म्हणजेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. आता निवडणुकीच्या आधी आचारसंहिता जारी होण्यापूर्वी हा मार्ग वाहतूक वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. (Thane Khadi Coastal Road)
सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हा मार्ग वाहतुकीस खुला झाल्यास मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी खाडीपूल-2 सह नवीन ठाणे खाडी पूल-3 चा (Thane Khadi Coastal Road) पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबई - पुणे प्रवास वाहतूक कोंडीमुक्त आणि वेगवान होणार आहे. मुंबई - पुणे प्रवासासाठी सध्या दोन खाडीपूल आहेत. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने ठाणे खाडी पूल-3 प्रकल्प हातात घेतला आहे. हा प्रकल्प आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला.
आता मात्र, या प्रकल्पाने वेग घेतला आहे. या प्रकल्पातील (Thane Khadi Coastal Road) मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे. पुढील 15 दिवसांत ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. तर या मार्गाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच हा मार्ग खुला होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मुंबई-पुणे प्रवास आता अधिक वेगवान होणार
दक्षिणेकडील बाजू वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालक, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान होणार आहे. ठाणे खाडी पूल-2 सह आणखी एक वाहतुकीचा पर्याय ठाणे खाडी पूल-3 (Thane Khadi Coastal Road) असणार आहे. त्यामुळे खाडी पूल-2 वरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे, तर मुंबई - पुणे प्रवास वेगवान होणार आहे. मात्र त्याच वेळी पुणे - मुंबई वाहतूक कोंडीमुक्त आणि वेगवान प्रवासासाठी प्रवासी, वाहनचालकांना आणखी चार महिने वाट पाहावी लागणार आहे. या मार्गाचे काम प्रगतीपथावरती आहे.
पुणे - मुंबई मार्गिकेचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबर 2024 च्याअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, जानेवारी 2025 मध्ये ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल, असेही गायकवाड यांनी सांगितले आहे. ठाणे खाडी पूल - 3 वरून पुणे-मुंबई प्रवास करण्यासाठी जानेवारी 2025 उजाडण्याची शक्यता आहे.