Mumbai local News : AC लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची आता खैर नाही, रेल्वे बोर्डाचं मोठ पाऊल, विनातिकीट सापडल्यास....
पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत.
मुंबई : पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. प्रवास श्रेणीनुसार दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार आहे. त्या प्रस्तावानुसार स्लीपर क्लाससाठी 500 रुपये, फर्स्ट क्लाससाठी 750 रुपये, तर एसी लोकलसाठी 1000 रुपयांचा दंड लागणार आहे. त्यावर जीएसटीही लागणार आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेमध्ये प्रवासासाठी सेकंड क्लास, फर्स्ट क्लास आणि एसी लोकल असे तीन प्रकार आहेत.
सध्या विनातिकीट प्रवाशांकडून 250 रुपये दंड आणि प्रवासाच्या तिकिटाचे शुल्क मिळून एकूण 255 रुपये आकारले जातात. फर्स्ट क्लासमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 250 रुपये दंड, तिकिटाचे मूळ शुल्क आणि 15 रुपये जीएसटी मिळून अधिक रक्कम वसूल केली जाते; परंतु विनातिकीट प्रवाशांवर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने नव्या प्रस्तावात विविध श्रेणींनुसार दंड आकारण्याची शिफारस केली आहे.
हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर हा नियम लागू होईल. प्रस्ताव लागू करण्यासाठी रेल्वे कायद्यात बदल आवश्यक असून, त्यासाठी लोकसभेत मंजुरी घेणे गरजेचे आहे. कोरोनानंतर उपनगरीय लोकल मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एका वेळी 50 ते 100 टीसी स्थानकात तपासणीकरिता तैनात करण्यात येत आहेत.
नवीन प्रस्ताव
स्लीपर क्लास : विनातिकीट प्रवास आढळल्यास 500 रुपये दंड
फर्स्ट क्लास : 750 रुपये दंड, अधिक जीएसटी
एसी लोकल : 1000 रुपये दंड, अधिक जीएसटी
हे ही वाचा -