MNS : दहा दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा खळखट्याक स्टाईलने उत्तर देऊ; कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला मनसेचे अल्टिमेटम
MNS Protest At Kurla Phoenix Mall : या मॉलमध्ये मराठी पाट्या लावण्यात आल्या नाहीत, ही त्यांची मुजोरी आहे असं मनसेने म्हटलं आहे.
![MNS : दहा दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा खळखट्याक स्टाईलने उत्तर देऊ; कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला मनसेचे अल्टिमेटम mns protest at mumbai kurla phoenix mall for marathi patya gives ultimatum marathi news MNS : दहा दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा खळखट्याक स्टाईलने उत्तर देऊ; कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला मनसेचे अल्टिमेटम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/8009c1c361ee8107d54d7833a5326588170109024907693_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे: मराठी पाट्यांच्या मुद्यावर मनसे (MNS On Marathi Patya) पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसून आलं. मनसैनिकांनी कुर्ल्यातील फिनिक्स मॉलवर (Kurla Phoenix Mall) धडक मारली आणि त्यांना समज दिली. येत्या दहा दिवसात जर या मॉलमध्ये मराठी पाट्या दिसल्या नाहीत तर मनसे खळखट्याक स्टाईलने उत्तर देईस असा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी मनसेचे चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली कुर्ला येथील फिनिक्स मॉलमध्ये घुसून मराठी पाट्यांच्या मुद्यावर आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वेळीच पोलिसांनी मनसैनिकांना अडवून ताब्यात घेतले. या वेळी मनसैनिक आणि मॉल प्रशासन यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण काही वेळासाठी तापले होते. मात्र पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले.
काही वेळाने मनसैनिकांना समज देऊन सोडण्यात आले. मात्र मनसेने फिनिक्स मॉलला दहा दिवसाची वेळ दिली आहे. अजूनही या मॉलमध्ये मराठी पाट्या लावण्यात आल्या नाहीत, ही त्यांची मुजोरी आहे. दहा दिवसात मराठी पाट्या लावल्या नाहीत तर दगडफेक करून असा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिला.
ठाण्यातील दुकानांच्या पाट्यांना काळं फासलं
दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी उच्च न्यायालयानं (Bombay High Court) दिलेली 25 नोव्हेंबरची मुदत संपली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झालीये. अंधेरी पश्चिमेकडील मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधेरी मार्केट मधील दुकानदारांना मराठी भाषेत फलक लावण्याचे आदेश दिलेत. तर दुसरीकडे ठाण्यात मराठी पाटी नसलेल्या शोरूमला मनसेने काळे फासले आहे. जर दुकानाचे नामफलक मराठीत (Marathi Board) झाले नाही तर मनसे स्टाईलने खळखट्याक करण्याचा इशाराच मनसेकडून देण्यात आला आहे,
मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरुन आक्रमक भूमिका घेतलीय. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर ठाण्यात दुकानांच्या पाट्यासंदर्भात मनसेचे आंदोलन केले आहे. ठाण्यात मनसेकडून एमजी मोटर्स शोरुमला काळे फसले आहे. मुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. नसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यावरून आक्रमक भूमिका घेतलीय. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईननंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)