(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC Election: तब्बल 38 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक
BMC Election : येत्या 7 मार्चला मुंबई महापालिकेचा कार्यकाल संपणार असून त्यानंतर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेचा कारभार नगरसेवक व प्रशासनाच्या माध्यमातून चालवण्यात येतो. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असून 7 मार्चला मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात येत असल्याने मुंबई महापालिकेवर प्रशासक नियुक्तीला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आली आहे.
यापूर्वी महापालिकेची मुदत कधी संपली होती. यापूर्वी 1984 मध्ये मुदत संपुष्टात आली होती. 1 एप्रिल 84 ते 25 एप्रिल 85 या कालावधीत मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. त्यामुळे, तब्बल 38 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमला जात आहे. तर 1990 मध्ये महिला आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने 1990 ते दोन वर्षांपासून मुदतवाढ देण्यात आली होती.
मुंबई महानगरपालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपत आहे. परंतु राज्यात कोविडची आपत्ती त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना यामुळे ही निवडणूक घेणे शक्य होणार नसल्याने प्रशासक नियुक्ती करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली होती. सद्यस्थितीत प्रशासक नियुक्तीबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 मध्ये कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे ही सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रस्थापित करण्यात येईल.
प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहील. त्यामुळे 7 मार्चनंतर मुंबईचा संपूर्ण कारभार पालिकेच्या माध्यमातून चालवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- BMC : मुंबईचे महापालिकेचे वॉर्ड आता 'असे' असतील; नवीन वॉर्ड पुनर्रचना प्रारूप अधिसूचना जाहीर
- मुंबईत काँग्रेसची स्वबळाची समीकरणं फिरणार? काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक!
- महापालिका निवडणुकीनंतर मुंबईकरांवर मालमत्ता करवाढीचा बोजा पडणार, 15 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live