एक्स्प्लोर

Amitabh Bachchan | अभिनेता अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण; नानावटी रुग्णालयात भरती

अभिनेता अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

मुंबई : बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना शहरातील नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अमिताभ यांनी स्वतः ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे. अमिताभ यांची काल (11 जुलै) कोरोना चाचणी केली होती. ज्याचा अहवाल आज आला आहे. अमिताभ यांचे ट्विट - माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घरातील सदस्यांच्याही कोरोना चाचणी करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. मागील 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी, अशी विनंतीही बच्चन यांनी केली आहे. T 3590 -I have tested CoviD positive .. shifted to Hospital .. hospital informing authorities .. family and staff undergone tests , results awaited .. All that have been in close proximity to me in the last 10 days are requested to please get themselves tested ! अमिताभ यांना सौम्य लक्षणं एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. यांनी सुरुवातीला सौम्य लक्षणं दिसताच त्यांनी कोरोना टेस्ट करुन घेतली. त्यांच्या आणखी चाचण्या करण्यात येत असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे. कुटुंब आणि स्टाफ क्वॉरंटाईन अमिताभ बच्चन यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या घरातील स्टाफचा कोरोना चाचणी करण्यात आलीय. सर्वांनी स्वतःला क्वॉरंटाईन करुन घेतले आहे. कुटुंबातील सदस्य आणि स्टाफचा रिपोर्ट येणे बाकी आहे. अमिताभ बच्चन लवकरचं रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा चित्रपट 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार आहे. याअगोदर बिग बी अखेरीस गुलाबो-सिताबो या चित्रपटात पाहायला मिळाले होते. या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. गुलाबो-सिताबो ओटीटी प्लेटफॉर्म रिलीज झाला होता. अमिताभ बच्चन सध्या त्यांचा प्रसिद्ध टिव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' च्या 12 भागाची तयारी करत होते. Amitabh Bachchan Corona positive | कोरोना झाल्याने महानायक अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget