एक्स्प्लोर
भारताच्या विजयानंतर बिग बींकडून विराटच 'बच्चन' स्टाईल अभिनंदन
कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडीजवर सहा विकेट्सनी दमदार विजय साजरा केला. यानंतर बॉलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कर्णधार विराट कोहलीचे आपल्या स्टाईलने अभिनंदन केलं आहे.
मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर आपल्या मजेदार ट्विटद्वारे नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. काल(7 डिसेंबर)भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीच्या शानदार 94 धावांच्या खेळीने बिग बी खूपच खूष झाले आणि त्यांनी विराटचे आपल्या अनोख्या शैलीत सोशल मीडियावर अभिनंदन केले.
विंडीजविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-ट्वेन्टीत भारताने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात कोहलीने 94 धावांची शानदार खेळी केली, ज्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन फार खूष झाले आणि त्यांनी खास शैलीत ट्विट करत कोहलीचं अभिनंदन केलं. अमर अकबर अँथनी या सुपरहिट चित्रपटाचा प्रसिद्ध संवाद रिक्रिएट करत विराटचं अभिनंदन केलं चित्रपटात हा संवाद अमिताभ बच्चन यांची व्यक्तिरेखा अँथनी याने दारूच्या नशेत म्हटला होता.
भारताचा दणदणीत विजय - कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने हैदराबादच्या पहिल्या टी-20 सामन्यात सहा विकेट्सनी दमदार विजय साजरा केला. या विजयासह टीम इंडियाने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात विंडीजने टीम इंडियासमोर 208 धावांचे मोठे आव्हान उभे केले होते. पण विराट आणि राहुलच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने हे आव्हान 8 चेंडू आणि सहा विकेट्स राखून पार केलं. विराटने 50 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 94 धावांची खेळी केली. तर राहुलने 40 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 62 धावा फटकावल्या. टीम इंडियाकडून टी-20 सामन्यात सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग हैदराबादमधल्या आजच्या सामन्यात टीम इंडियाने 208 धावांचा यशस्वी पाठलाग केला. टी-20 क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात भारताने केलेला हा सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग ठरला. हेही वाचा - IND VS WI 1st T20 - भारताचा दणदणीत विजय, विराटच्या नाबाद 94 धावा Anushka Sharma | 'त्या' आरोपांवर अभिनेत्री अनुष्का शर्माचं सणसणीत उत्तर | ABP MajhaT 3570 - यार कितनी बार बोला मई तेरे को .. की Virat को मत छेड़ , मत छेड़ , मत छेड़ ... पन सुनताइच किधर है तुम ... अभी पर्ची लिख के दे दिया ना हाथ में !!!! ???????????? देख देख .. WI का चेहरा देख ; कितना मारा उसको , कितना मारा !! ( with due respects to Anthony bhai , of AAA ) pic.twitter.com/BypjyHdA86
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement