एक्स्प्लोर

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर, 5 पोलीस कर्मचारी अडचणीत, कोर्टात खटला चालणार?

Akshay Shinde Badlapur: बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा 5 पोलिसांवर ठपका. महायुती सरकारला मोठा झटका. पोलिसांच्या दावा खोटा

मुंबई: बदलापूर  लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी बनावट चकमकीत ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांना स्वसंरक्षणार्थ त्याला मारावे लागले, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, याप्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली असता अक्षयने ज्या रिव्हॉल्व्हरमधून पोलिसांवर गोळीबार केल्याचा दावा करण्यात आला होता, त्या बंदुकीवर अक्षयच्या बोटांचे ठसे आढळून आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांचा आत्मसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे. परिणामी गाडीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनीच अक्षयला बनावट चकमकीत (Akshay Shinde Encounter) ठार मारले, हा अक्षयच्या आई-वडिलांचा दावा खरा आहे, असे चौकशी अहवालात म्हटले आहे. यामुळे अक्षय शिंदे एन्काऊंटरमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी हा चौकशी अहवाल सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी या अहवालाचे वाचन केले. या अहवालात एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलिसांवर कारवाई होणार आहे. सर्वप्रथम पोलिसांवर अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत ठार मारल्याचा गुन्हा दाखल होईल. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांवर खटला चालवला जाईल. त्यामुळे आता याप्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस दल आणि राज्य सरकार काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

दरम्यान, या अहवालाची माहिती समोर आल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बदलापूरच्या घटनेमध्ये जो अहवाल न्यायालयात सादर केला. त्यावर न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्यांनी निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. जो कोणी दोषी असेल, जाणून बुजून एन्काऊंटर केला असेल तर न्यायालय निर्णय घे याबाबत शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.

मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं होतं?

अक्षय शिंदे याच्यावर बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. 23 सप्टेंबरला त्याला तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेले जात होते. अक्षय शिंदे याला घेऊन जाणारी पोलिसांची गाडी मुंब्रा बायपासच्या परिसरात होती. त्यावेळी अक्षय शिंदे याने याने एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली. त्याने निलेश मोरे यांच्यावर त्याने 3 गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरेंच्या पायाला लागली आणि 2 गोळ्यांचा नेम चुकला. त्यावेळी गाडीतील इतर पोलीस अधिकाऱ्यांनी  स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. यामध्ये अक्षयच्या डोक्यात गोळी शिरली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. 

आणखी वाचा

रस्ता क्रॉस करतानाही तो हात पकडायचा, तो गोळीबार कसा करू शकतो? एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदेची आई काय म्हणाली? 

अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा अन् हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला; संजय राऊतांच्या पोस्टने सस्पेन्स वाढला

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget