एक्स्प्लोर

Ajit Pawar : विधानसभेत अजित पवारांची शिवसेनेसाठी जोरदार बॅटिंग; अजितदादांच्या भाषणातील महत्वाचे 10 मु्द्दे

Ajit Pawar Maharashtra Political Crisis माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार बॅटिंग केली. त्यांनी शिवसेनेच्या बाजूनं खिंड लढवत बंडखोर आमदारांवर देखील निशाणा साधला.

Maharashtra Political Crisis : राज्य विधानसभेत आज एकनाथ शिंदे सरकारनं बहुमताची परीक्षा पास केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार बॅटिंग केली. आजही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधत खोचक टोलेबाजी केली.  शिवाय त्यांनी शिवसेनेच्या बाजूनं खिंड लढवत बंडखोर आमदारांवर देखील निशाणा साधला.

  1. भाजपाने शिवसेनेसोबत राहून त्यांची ताकद वाढवली. प्रत्येकजण आपआपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचं काम करत असतो. आघाडी असली तरी एकनाथ शिंदे त्यांच्या गटाची ताकद वाढवण्यावर भर देतील, फडणवीस त्यांचा पक्ष वाढवण्यावर भर देतील.
  2. आज देवेंद्रजींना भाषण करताना पाहिलं पण उत्साह नव्हता. विधिमंडळात निवडून आलेल्या आमदारांमध्ये सर्वात नशीबवान देवेंद्र फडणवीस. अडीच वर्षात ते मुख्यमंत्रीही झाले, उपमुख्यमंत्रीही झाले आणि विरोधी पक्षनेतेही झाले. एकही महत्वाचं पद त्यांनी सोडलं नाही.
  3. एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत हे सतत का सांगावं लागतं, याचं आत्मपरीक्षण व्हायला हवं. सत्ता येते सत्ता जाते, ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलं नाही. फडणवीसजी तुम्ही इतकं शिंदे यांचं कौतुक करत होते मग तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांना रस्ते विकासचं खातं का दिलं, त्यांना महत्वाचं खातं का दिलं नाही. 
  4. शिंदे जर सर्वगुणसंपन्न होते तर रस्तेविकास महामंडळाचं खातं का दिलं, जनतेची संबंधित खातं का दिलं नाही. महाराष्ट्रही याबाबत विचार करेल. नेता मोठा असेल तर खाती जास्त असतात. चंद्रकांत पाटील यांना ते माहिती आहे.
  5. काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत त्याआधी तुम्ही बहुमताची चाचणी घेतली. ठराव इतका घाईत आणण्याची गरज नव्हती असं तज्ञ म्हणतात. काही गोष्टी लांबणीवर टाकण्याचं काम राज्यपाल महोदयांनी केलं आहे. आता एकदम तडफेनं काम चाललंय. राज्यपाल महोदय अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांकडे अध्यक्ष निवडीसाठी गेलो मात्र ती झाली नाही. आता चार दिवसात किती वेगानं घटना घडला. महाराष्ट्रातील जनता याचा विचार करत आहे.
  6. गेल्या काही दिवसात अनेकांना खूप काही बघायला मिळालं. सूरतला जायला मिळालं, तिथून गुवाहाटीला जायला मिळालं तिथून गोव्याला गेले. दहा दिवसात आमदारांना हयातीत इतकं फिरायला मिळालं नसेल
  7. शहाजी बापू म्हणतात काय झाडी काय डोंगार काय हाटेल, ओक्के ओक्के. बापू आपण 95 ला एकत्र निवडून आलो. यात फार गोंधळून जायचं कारण नाही. ही मोठी लोकं एकत्र कधी येतील कळणारही नाही. तुम्ही मागे राहाल. बाकीचे म्हणतील आम्ही कधी तसं म्हटलं नव्हतो.
  8. शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यावर कारण काही आमदारांनी टेबलावर जाऊन डान्स केला. सत्ता येत असते सत्ता जात असते. सगळे लोकं पाहात असतात. प्रवक्ता म्हणून केसरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार आहेत, असं ते म्हणाले. अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळाचं स्थिरस्थावर होत नाहीत तोवर काही जण गप्प आहेत. त्यातले अब्दुल सत्तार एक आहेत. सूरत जाण्याआधी आमच्यासोबत अब्दुल सत्तार दोन तास गप्पा मारत बसले होते आणि लगेच सूरतला गेले.
  9. मी आजपर्यंत महाराष्ट्रातील लोकांना कुणाला बोललो नव्हतो. मात्र, आज मला सांगायचं आहे की भाजपासोबत गेल्यावर महाविकासआघाडी अनैसर्गिक आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला असा पाढा वाचण्याचं काम केलं. वास्तविक देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर सर्व नेत्यांना माहिती आहे की मी काम करताना असा भेदभाव सहसा करत नाही. 
  10. मी अर्थमंत्री असताना 1 कोटी आमदार निधी मी 2 कोटी केला. आघाडी सरकार आल्यावर 3 कोटी केला. दुसऱ्या वर्षी 4 कोटी, आता 5 कोटी केला. अजिबात भेदभाव केला नाही. 288 आमदारांना सर्व पैसे मिळाले पाहिजे. 

इतर महत्वाच्या बातम्या

बहुमत प्रस्तावाच्या विरोधात 'मविआ'ला शंभरीही गाठता आली नाही; अशोक चव्हाणांसह 'हे' सदस्य गैरहजर

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला

Devendra Fadnavis : ज्यांनी टिंगल केली, अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार, फडणवीसांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maha Vikas AGhadi : निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित!
निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित!
Raj Thackeray: शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका 
शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका 
Raj Thackeray:
"मला एक खून माफ करा", राज ठाकरेंची राष्ट्रपतींना विनंती; भर सभेत असं का म्हणाले?
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकींच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय...'
बाबा सिद्दिकींच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Baba Siddique : सिद्दीकी हत्येप्रकरणी दोन आरोपी अटकेत; तपास सुरू - फडणवीसBaba Siddique Bishnoi Gang : दाऊद आणि सलमान खानसोबत संबंध ठेवल्यानं सिद्दीकी यांची हत्याChhagan Bhujbal on Baba Siddique : बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणावरून छगन भुजबळांचा संतापNana Patole : मुख्यमंत्री म्हणून जिल्ह्यातील पोरगा मोठा होतोय, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Vikas AGhadi : निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित!
निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित!
Raj Thackeray: शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका 
शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका 
Raj Thackeray:
"मला एक खून माफ करा", राज ठाकरेंची राष्ट्रपतींना विनंती; भर सभेत असं का म्हणाले?
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकींच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय...'
बाबा सिद्दिकींच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय...'
Chhagan Bhujbal: 'जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याचीही..', बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणावरून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर
जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याचीही..', बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणावरून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : जरांगे पाटील येवल्यात धडकण्यापूर्वीच भुजबळांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले, माझे कार्यकर्ते...
जरांगे पाटील येवल्यात धडकण्यापूर्वीच भुजबळांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले, माझे कार्यकर्ते...
Baba Siddique Shot Dead : गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा,  बाबा सिद्दिकी प्रकरणावरून राऊतांचे फडणवीसांवर टीकास्त्र, म्हणाले, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा...
गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा, बाबा सिद्दिकी प्रकरणावरून राऊतांचे फडणवीसांवर टीकास्त्र, म्हणाले, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा...
Shahajibapu Patil: अजितदादांचा शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात येताच शहाजीबापू पाटील 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये, तिरंगी लढतीची शक्यता
अजितदादांचा शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात येताच शहाजीबापू पाटील 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये, तिरंगी लढतीची शक्यता
Embed widget