Ajit Pawar : अजित पवार, छगन भुजबळ कोरोनामुक्त, अधिवेशनासाठी दाखल
Ajit Pawar Corona negative : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनामुक्त झाले आहेत. अजित पवार हे विधानमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनासाठी उपस्थित झाले आहेत.
Ajit Pawar Corona negative :राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे कोरोनामुक्त झाले आहेत. अजित पवार आणि छगन भुजबळ हे विधानमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनासाठी उपस्थित झाले आहेत. अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळं त्यांनी आज अधिवेशनात हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ आणि अजित पवारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यामुळे ते आयसोलेशनमध्ये होते. अशातच शुक्रवारी चाचणी केली असता पुन्हा अजित पवारांची अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं ते अधिवेशनात येणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं.
राज्यातील सत्तासंघर्षामध्ये महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. अशातच 3 आणि 4 जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. शपथ घेतली. पण शपथविधीवेळी फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. पण येत्या अधिवेशनात नवनिर्वाचित सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
कसं असणार आहे आज सभागृहाचं कामकाज....
दोन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. विधानसभेचं कामकाज 11 वाजता सुरु होईल. मंत्र्यांचा परिचय होईल. नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय. अध्यक्ष निवडणूकीच्या संदर्भात राज्यपालांच्या संदेशाच वाचन केल जाईल. अध्यक्ष निवडणूकीच्या कामाची घोषणा केली जाईल. भाजप आणि शिंदे गटाच्या वतीने चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील. त्यानंतर गिरीश महाजन अनुमोदन देतील
महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून चेतन तुपे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राजन साळवी यांचा प्रस्ताव ठेवतील. या प्रस्तावाला संग्राम थोपटे अनुमोदन देतील. यानंतर अवाजी पद्धतीने अध्यक्षांची निवड होईल. या निवडणुकीनंतर शोकप्रस्ताव होऊन सभागृहाचं कामकाज तहकूब होईल, अशी शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या