एक्स्प्लोर

Anil Gote : ..म्हणून वडिलकीचा सल्ला देतो, मानला तर आपलाच फायदा! मुख्यमंत्री शिंदेंना माजी आमदारांचे पत्र

Anil Gote Letter To Eknath Shinde : नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी आमदार अनिल गोटे यांनी एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी शिंदेंना सल्ला देत काही अनुभव सांगितले आहे.

Anil Gote Letter To Eknath Shinde : नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना माजी आमदार अनिल गोटे (MLA Anil Gote) यांनी एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी शिंदेंना सल्ला देत काही अनुभव सांगितले आहे. तसेच त्यांना ज्येष्ठ म्हणून वडीलकीचा सल्ला देतो, मानला तर आपलाच फायदा आहे असं म्हटलंय, नेमकं काय लिहलंय या पत्रात?

माजी आमदार अनिल गोटेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलंय, काय लिहलंय?

"नवनियुक्त मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांना मी लिहिलेले अनावृत्त पत्र..."

"माननीय एकनाथ शिंदे साहेब, 
आपली मुख्यमंत्री पदावर निवड झाल्याबद्दल मी यापूर्वीच हृदयापासून अभिनंदन केले. मोगँबो खुश हुआ. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे अनुभवलेत, म्हणून वडीलकीचा सल्ला देतो. मानला तर आपलाच फायदा होईल. किमान फसवणूक व नंतर पश्चाताप होणार नाही. ही एक लाख टक्के खात्री देतो. 
देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका ! मी कुठलाही स्वार्थ, काडी ईतकी लाभाची अपेक्षा ठेवली नाही. या नीच, हलकट, पाताळयंत्री, दगलबाज, कपटी,  खोटे बोलण्याचे अनन्यसाधारण अंगभूत गुण असलेल्या माणसावर श्रद्धा ठेवली. विश्वास ठेवला. हा माणूस चुकून सुध्दा दगलबाजी करणार नाही, असे मला वाटले होते. 
मी त्यावेळी भाजपचा आमदार होतो. ते मुख्यमंत्री होते. रात्री दहा वाजेपासून दोन वाजे पर्यंत सलग चार तास चर्चा केली. मी स्वतःहून म्हणालो साहेब तुम्हाला काही अडचण असेल तर मोकळेपणाने सांगा. मी स्वतःहून बाजूला होतो. हा हलकट लबाड म्हणतो कसा ‘गोटेसाहेब तुम्ही पक्षाचे अॅसेट आहात. तुम्हाला मी शब्द नव्हे वचन देतो. उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत जाहीर करतो.’ 

ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषदेत जाहीर केले. मी स्वतः भेटून आभार मानले, मला शुभेच्छा दिल्या. कुठलीही सभ्य सुसंकृत खानदानी व्यक्ती एखाद्या व्यक्तीने एवढे सर्व सांगितल्यावर अविश्वास दर्शवेल कसा ? मी  प्रामाणिकपणे व एका निष्ठेने वागत आलो. स्वर्गीय वसंतराव भागवत, स्वर्गीय रामभाऊ गोडबोले अशा ऋषीतुल्य व्यक्तींचे संस्कार असल्याने व त्यांच्या देवरदुर्लभ सहवासामुळे तसेच दिलेला शब्द प्राण गेला तरी बेहत्तर पण तसूभरही मागे न हटणाऱ्या माननीय नितीन गडकरी साहेबांनी अत्यंत संकटकाळी दिलेल्या आधाराच्या पाश्वर्वभूमीवर माझ्या मनात शंका येवूच कशी शकेल ?

स्वर्गीय नानासाहेब उत्तमरावांनी तर सलग तीस वर्ष पुत्रवत प्रेम केले. स्वर्गीय प्रमोद महाजन, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी धाकट्या भावाप्रमाणे सांभाळले. कधी शब्द खाली पडू दिला नाही. कधी तर तोंडातून शब्द उच्चारण्यापूर्वीच मनकवडे असल्याप्रमाणे ओळखत !. स्वर्गीय बाळासाहेबांना लहर आली की, माझ्या दोन मुलांसह भेटायला बोलवत असत. अनेकदा आग्रहपूर्वक बरोबर जेवायला बसवत. माननीय उद्धवजी साक्षीदार आहेत. 

मी एक लहान कार्यकर्ता ! मी त्यांना मदत तरी काय करणार ? साहेब तर, जाम खूष असत. अनेकदा प्रेमाने रागवत! किती दिवस अस कफल्लक राहशील? शिवसेनेत ये. तुझ्या आयुष्याचं सोनं करुन टाकतो. मला बाकी काही नकोच होतं. प्रेमाची भूक भागविली जात होती. मणी नावाचे एक पी. ए . होते. साहेबांनी त्यांना सांगीतलं आत्ताच्या आत्ता पत्रकारांना बोलवा "आज या गोट्याला, सोडायच नाही" असे म्हणाले. 

पण साहेबांच्या प्रेमाशिवाय मला काही नकोच होतं. माननीय मनोहर जोशी सर यातील काही प्रसंगाचे साक्षीदार आहेत. तेलगी प्रकरणातून तब्बल चार वर्षानंतर बाहेर आलो. पहिला फोन कै. गोपीनाथ मुंडे साहेबांचा! दुसरा बाळासाहेबांचा, तिसरा नितीनजींचा ! साहेबांनी तर सौ. हेमा, मुलगा तेजस यांना आवर्जून जेवायला बोलवल ! 
मी हे सगळं यासाठी सांगितल की, आभाळाएवढ्या उंच उंच व्यक्तीनी मला दिलेला विश्वास, प्रेम आणि आपुलकी कुठे ? आणि फडणविसांची दगलबाजी कुठे ? आजही मनोहर जोशी सरांना विचारा सर्व संधी उपलब्ध असतांना कधी एका तांबड्या पैशाची मदतीची अपेक्षा केली का ? 

देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना माझा काडीचाही त्रास नसतांना त्यांच्याइतपत हलकट, नीच, लबाड, धोकेबाज व भ्रष्ट दुराचारी मित्रांचा आत्मा संतुष्ट करण्यासाठी माझ्या सारख्या धनगर समाजातील कार्यकत्याचा छळ केला. मनाचा तका क्षुद्र की आपल्याकडून अनवधानाने का होईना पण अन्याय झाला, हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याकडे नाही. अशा राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहावे अशी मनोमन भावना असल्याने आलेला अनुभव शेअर केला. परमेश्वर अशा पशुतुल्य राक्षसी संकटापासून आपले रक्षण करो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना !"

मानलात तर आपला मित्र, 
अनिल गोटे

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोरSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एकजण ताब्यात, पोलिसांकडून तपासाला वेग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Embed widget