एक्स्प्लोर

मुंबई पूर्वपदावर, रेल्वे, मेट्रो आणि रस्ते वाहतूक सुरु

भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करताच मुंबईचे रस्ते, लोकल आणि मेट्रो हे तिन्ही मार्ग सुरु झाले.

मुंबई : सकाळी 8 वाजेच्या सुमारास बंद झालेली मुंबई दिवसभराच्या खोळंब्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यापासून पूर्वपदावर येऊ लागली. भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करताच मुंबईचे रस्ते, लोकल आणि मेट्रो हे तिन्ही मार्ग सुरु झाले. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, मुंबईत झालेल्या हिंसेच्या घटनांप्रकरणी आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया मुंबई पोलिस सुरु करणार आहेत. दिवसभर रेल्वे सेवा ठप्प आंबेडकरी आंदोलकांनी मुंबईकरांच्या लाईफलाईनला अडवल्याने प्रवाशांची गोची झाली. सर्वात आधी पश्चिम रेल्वेवर वसई आणि नालासोपाऱ्यात आंदोलकांनी लोकल अडवल्या आणि त्यानंतर हे लोण इतरत्र पसरलं. आंदोलन सुरु होण्याच्या तासाभरातच मुंबईच्या तिन्ही मार्गावर लोकल बंद करण्यात आल्या. विशेषतः ठाणे, घाटकोपर, विक्रोळी या मध्य रेल्वेवरच्या स्थानकांवर लोकल जागच्या जागी थांबवण्यात आल्या. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांनी लोकल सोडून रुळांवरून चालत ऑफिस गाठलं. तर काही प्रवासी माघारी परतले. विक्रोळीमध्ये एका लोकलवर दगडफेकीची घटना घडल्याची माहितीही समोर आली आहे. हार्बर लोकल मार्गावर जुईनगरमध्ये आंदोलकांनी लोकल अडवल्या. पण नंतर तासाभराने आंदोलकांना हटवून वाहतूक सुरु करण्यात आली. रस्ते वाहतूक पूर्ववत मुंबईमध्ये बंदचा मोठा फटका बसला तो रस्ते वाहतुकीला... आंबेडकरी संघटनांच्या आंदोलकांनी मुंबईचे महत्त्वाचे महामार्ग पूर्णपणे बंद करुन टाकले होते. पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सायन पनवेल महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावर आज वाहनधारकांची सर्वाधिक कोंडी झाली. प्रत्येक उपनगराच्या नाक्यावर आंबेडकरी आंदोलकांनी नाकाबंदी केली होती. त्यामुळे बरेच प्रवासी रस्त्यातच अडकून होते. विशेषत: घाटकोपर, विक्रोळी, पवई आणि चेंबूर या भागांमध्ये वाहतूक कोडी झाली होती. बंद मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत झाली आहे. मेट्रो सेवा सुरु आजपर्यंत आंदोलनामुळे कधीही ठप्प न झालेली मेट्रोही आज बंद करावी लागली. सकाळी आंबेडकरी संघटनांनी घाटकोपरच्या मेट्रो स्थानकावर रुळावर उड्या घेत मेट्रो बंद पाडली. त्यामुळे कसेबसे घाटकोपरपर्यंत पोहोचलेल्या प्रवाशांना पश्चिम उपनगरात पोहोचण्याचा मार्गही बंद झाला. त्यामुळे अनेक लोकांनी पायी जाण्याचा पर्याय घेतला. दरम्यान मेट्रोची वाहतूक काही काळाने वर्सोवा ते विमानतळ रस्ता स्थानकापर्यंत सुरु करण्यात आली. पण संध्याकाळी 5 वाजता वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो वाहतूक पूर्ववत झाली. मुंबईसह सर्व मोठ्या शहरांमध्ये बंदचा परिणाम महाराष्ट्र बंदमुळे मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या महानगरांमध्ये आज शुकशुकाट बघायला मिळाला. मुंबईसह परिसरातील उपनगरं अक्षरश: ठप्प होती. पुण्यातही काहीशी मुंबईसारखी परिस्थिती बघायला मिळाली. अनेक ठिकाणी आंदोलकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरात अनेक ठिकणी बंद पाळण्यात आला. तर उपराजधानी नागपुरातही या बंदचा परिणाम जाणवला. बाजारपेठा, सरकारी आणि खाजगी वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Embed widget