एक्स्प्लोर
‘मी परवाच इथे आलो होतो, तेव्हाच आगीची भीती व्यक्त केली होती’
‘आपण कालच या ठिकाणी आलो होतो तेव्हाच इथल्या अग्निशमन यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.’ असं वक्तव्य युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

मुंबई : ‘आपण कालच या ठिकाणी आलो होतो तेव्हाच इथल्या अग्निशमन यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.’ असं वक्तव्य युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? ‘काल मी महापौर साहेबांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांना विनंती केली की, कमला मिल, तोडी मिल आणि रघुवंशी मिल या तीनही ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास फायर इंजिनला देखील घुसण्याची जागा नाही. त्यामुळे तिथे फायर ऑडिट होणं गरजेचं होतं. परवाच मी इथं आलो होतो. तेव्हा हेच पाहण्याच्या प्रयत्न केला की, हे अधिकृत आहे का? त्यावेळी मी आग लागल्यास काही सुरक्षेचे उपाय आहेत का? याचीही विचारणा केली होती. पण त्याचवेळी मला या गोष्टीची भीती वाटली होती. त्यामुळे याप्रकरणी ज्यांनी हयगय केली त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. यासोबतच मिलचे मालक किंवा हॉटेलचे मालक यांच्यावरही कारवाई केली जाईल.’ असं आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, खुद्द आदित्य ठाकरेंच्या भाकितानंतरही तातडीनं पावलं का उचलली गेली नाहीत? असा प्रश्न आता निर्माण होतो आहे. त्यामुळे मुंबईचे कारभारी म्हणवणारे शिवसेनावाले केवळ भाकित वर्तवण्यासाठी आहेत की अंमलबजावणीसाठी? हा प्रश्न आता मुंबईकर विचारत आहेत. मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. VIDEO : 5 अधिकाऱ्यांवर कारवाई कमला मिल अग्नितांडवात 14 बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. पालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कमला मिलच्या परवानग्यांशी संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई - जी साऊथ वॉर्ड ऑफिसर सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर अन्य पाच इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे. निलंबित अधिकारी
- मधुकर शेलार पदनिर्देशित अधिकारी
- धनराज शिंदे ज्युनिअर इंजिनियर
- महाले सब इंजिनिअर
- पडगिरे - वैद्यकीय आरोग्य अधिकारी
- एस. एस. शिंदे -अग्निशमन अधिकारी
आणखी वाचा























