Sanjay Raut : रोहित पवार पोलीस स्टेशनला असताना एका वजनदार व्यक्तीचा फोन आला अन् डीसीपी मुंढेंची वागणूक बदलली: संजय राऊत
राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या जवळचा नातेवाईक तक्रार करायला जातो आणि विधिमंडाळाच्या एका बड्या नेत्याचा तक्रार घेऊ नका म्हणून फोन येतो, हा काय प्रकार आहे? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut on Ajit Pawar Plane Crash : आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) दिवंगत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar Plane Crash death) जी अभ्यासपूर्ण मांडणी केली ती थक्क करणारी आहे. डीजीसीए पासून (DGCA) ते व्हीआरएस (VSR Ventures Pvt. Ltd) कंपनीपर्यंत आणि व्हिजिबीलीटीपासून ते ब्लॅक बॉक्सपर्यंत अनेक गोष्टीबाबत बऱ्याच बाबी मी त्यांच्याकडून समजून घेतल्या. आता प्रश्न इतकाच आहे कि, राज्याचे सरकार आणि मुख्यमंत्री याला अपघात म्हणताय. मात्र आम्ही याला अपघात म्हणणार नाही. आम्ही याला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा म्हणतोय. आपला एक सहकारी आणि राज्याचे उपमुख्यमंत्र्याचा यात मृत्यू होत असताना हि बाब सरकार हलक्यात घेतंय.अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. Sanjay Raut on Ajit Pawar Plane Crash
रोहित पवार हे काल मारिन ड्राइव्ह पोलीस स्थानकात जाऊन डीजीसीए आणि व्हीएसआर (VSR Ventures) कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी केलीय. मात्र ती मागणी फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या जवळचा नातेवाईक तक्रार करायला जातो आणि विधिमंडाळाच्या एका बड्या नेत्याचा तक्रार घेऊ नका म्हणून फोन येतो, हा काय प्रकार आहे? म्हणजे सरकारचे जे अश्रू आहे ते मगरेचे अश्रू होते का? असा खोचक सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ते पत्रकार परिषदेत दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशी संदर्भात बोलत होते.
Sanjay Raut on Ram Mohan Naidu : विमान वाहतूकमंत्री नायडूंचे आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकांमध्ये आर्थिक व्यवहार
DGCA ने अशा अनेक हत्या केल्याय. अहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान पडलं, त्याचं पुढे काय झालं? तुम्ही त्या पायलटला जबाबदार ठरवताय, बारामतीमध्ये जे व्हीएसआरचं विमान कोसळलं तेही प्रकरण दाबण्याचा, आणि यात काहीतरी लपवण्याचा प्रकार सुरु आहे. व्हीएसआर कंपनीत अनेक राजकारण्यांचे पैसे गुंतलेत, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय' व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीमध्ये अनेक राजकारण्यांचे, अनेक मंत्र्याचे पैसे गुंतलेले आहे. केंद्रीय विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडूंचे आणि व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या मालकांचे आर्थिक व्यवहार आणि देवाण घेवाण आहे. मग या प्रकरणाचा काय तपास होणार? असा खळबळजनक आरोप करत खासदार संजय राऊतांनी या प्रकरणाच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे. रोहित पवारांकडून या प्रकरणातले अनके बारकावे मी समजून घेतले. ते जे मुद्दे मांडताय ते अतिशय योग्य आहे. असेही ते म्हणाले.
Sanjay Raut on NCP : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया आता संपली
सुनित्रा ताई यांना आमच्या शुभेच्छा आहेत. एकत्र येण्याची प्रक्रिया आता संपली आहे आणि जर अजित दादा एकत्र आले असते तर अजित दादा भाजपातून बाहेर आले असते, ही माझी माहिती आहे. अजितदादा यांना भाजपमधून बाहेर पडायचं होतं. भाजपने दादांनाही फसवले आहे. रोहित पवार आणि कुटुंब मागणी करत आहे तर चौकशी झाली पाहिजे. दरम्यान, तीन पक्ष राज्यसभेचा विषयावर एकत्र बसतील. आम्ही एकत्र चर्चा करणार आहोत. शरद पवार निवडणूक लढणार आहेत. मी त्यांची चौकशी केली. महाविकास आघाडी एकत्र निर्णय घेईल. 4 लोक निवृ्त्त झाले आहेत आणि सगळे लोक दावा सांगत आहे. पण तिन पक्ष एकत्र येऊन हा निर्णय घेतील असेही संजय राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























