एक्स्प्लोर

Rohit Pawar: मोठी बातमी: मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात FIR वरुन राड्यानंतर रोहित पवारांना CMO मधून फोन गेला, नेमकं काय घडलं?

Rohit Pawar: रोहित पवार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू आणि व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोलीस डीसीपी आणि रोहित पवारांची बाचाबाची

Rohit Pawar: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमागे घातपात असल्याचा  आरोप करणारे आणि या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मुख्यमंत्री कार्यालयाने फोन केल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार हे बुधवारी अजित पवार विमान अपघातप्रकरणात (Ajit Pawar Plane Crash) नागरी उड्डाण संचलनालयाविरोधात (डीजीसीए) तक्रार दाखल करण्यासाठी मुंबईच्या मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, याठिकाणी पोलिसांनी त्यांची FIR स्वीकारण्यास नकार दिला होता. यावरुन रोहित पवार आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीही झाली होती. या सगळ्या घटनेनंतर मुख्यमंत्री कार्यालयातून रोहित पवार यांना फोन गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा फोन वेगळ्या कारणासाठी करण्यात असल्याचे समजते. (Maharashtra Poliitcs news)

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने हा फोन आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रोहित पवार यांच्याकडून बारामती येथे आणि मुंबईत देवगिरी या शासकीय निवासस्थानी अजित पवार यांचे स्मारक (Ajit Pawar Memorial) करण्याची मागणी करण्यात आली होती. या स्मारकाच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात तरतूद करण्याबाबतच्या चर्चेसाठी फोन आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यावर रोहित पवार काय म्हणाले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. 

दरम्यान, रोहित पवार हे आज अजित पवार अपघातप्रकरणी डीजीसीएविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी बारामती (Baramati news) तालुका पोलीस ठाण्यात येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राजेंद्र पवार आणि युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हेदेखील असतील. सध्या बारामती पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. काल मुंबई पोलिसांनी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात FIR दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता बारामती पोलीस याप्रकरणात तक्रार नोंदवून घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकीकडे रोहित पवार बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी येत असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

आणखी वाचा

रोहित पवारांची FIR लिहायला घेतली इतक्यात डीसीपी मुंडे आले अन् म्हणाले... मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात बाचाबाची

अजितदादांसाठी दोन्ही पुतणे मैदानात उतरणार; मुंबईत FIR घेतली नाही, आता रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात जाणार

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Sunetra Pawar and Congress: सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं, हर्षवर्धन सपकाळांची प्रेस सुरु असताना राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण काँग्रेसच्या कार्यालयात घुसले अन्...
सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं, हर्षवर्धन सपकाळांची प्रेस सुरु असताना राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण काँग्रेसच्या कार्यालयात घुसले अन्...
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Embed widget